नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यात झालेल्या (India-China Face Off 20 Javan Martyr) धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी (16 जून) दुपारी भारतीय सेनेचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. तर, 17 जवान हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, आता हे 17 जवान देखील शहीद झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन संघर्षात आतापर्यंत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 वर पोहोचली आहे.
And exposed to sub-zero temperatures in the high altitude terrain have succumbed to their injuries, taking the total that were killed in action to 20. Indian Army is firmly committed to protect the territorial integrity and sovereignty of the nation: Indian Army (2/2) https://t.co/5duc0Jlfwb
— ANI (@ANI) June 16, 2020
चीनी भागात हेलिकॉप्टरची वर्दळ वाढली
दरम्यान, चीनी भागात हेलिकॉप्टरची वर्दळ वाढली आहे. चीनी सैनिकांना नेण्यासाठी हेलिकॉप्टरची वर्दळ आहे. जखमी आणि मृत चीनी सैनिकांसाठी हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली (India-China Face Off 20 Javan Martyr).
सोमवारी (15 जून) रात्री भारत-चीन सेनेमध्ये अचानक संघर्ष उफाळून आला. लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर सर्व सामान्य होईल असं वाटत असतानाच ही घटना घडली.
Increase in Chinese chopper activity observed across the LAC to airlift casualties suffered by them during face-off with Indian troops in Galwan valley: Sources to ANI https://t.co/uMExblXYxq
— ANI (@ANI) June 16, 2020
दोन्ही देशात शांततेवर सहमती
दोन्ही देश चर्चेद्वारे तणाव कमी करण्यावर सहमत, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची ग्लोबल टाईम्सला प्रतिक्रिया, सीमेवर शांतता ठेवण्यावर सहमती, चीन सैन्याने सीमा रेषेचं उल्लंघन करु नये असे भारतास सांगितले, कुठलीही एकतर्फी कारवाई तणाव वाढवेल, असं चिनी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं (India-China Face Off 20 Javan Martyr) आहे.
45 वर्षांनी शांतता कराराचा चीनकडून भंग
1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.
संबंधित बातम्या :
Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?
India China Face Off | आमचे 5 जवान भारताने मारले, चीनचा दावा, गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये संघर्ष
India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?