नवी दिल्ली : एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे, मात्र त्याने देशासाठी प्राणार्पण केले, याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात धारातीर्थी पडलेल्या शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांच्या मातोश्रींनी दिली. (India China Face off Martyr Col Santosh Babu Mother Reaction)
शहीद कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा या दुःखद वृत्तालाही मोठ्या धीराने सामोऱ्या गेल्या. “आता तो मला अम्मा म्हणून हाक मारणार नाही. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे. पण देशासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, याचा मला अभिमान आहे” असं त्या म्हणाल्या.
शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची हैदराबादमध्ये पोस्टिंग झाल्याची ऑर्डर 3 महिन्यांपूर्वीच हाती आली होती. मात्र लॉकडाऊन व चीनसोबत असलेल्या तणावामुळे पोस्टिंग लांबली होती. त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी कित्येक दिवसांपासून वडिलांच्या प्रतीक्षेत होते, मात्र दुर्दैवाने त्यांच्या हौतात्म्याचे वृत्त धडकले.
At first,we didn’t believe it but later higher authorities told us what had happened.We’re under deep shock.Our son faced many challenges: Parents of Col Santosh Babu,Commanding Officer,16 Bihar regiment who lost his life in violent face-off with Chinese soldiers in Galwan valley pic.twitter.com/m0LggsLCPO
— ANI (@ANI) June 17, 2020
हेही वाचा : भारत-चीन संघर्ष वाढला, भारतापुढे आता कोणते मार्ग?
चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याची माहिती आहे. गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. हे खोरे चीनच्या दक्षिण शिनजियांग ते भारताच्या लडाखपर्यंत पसरलेले आहे
भारतीय सैन्याने अधिकृत निवेदन जारी केल्यानंतर तासाभरातच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषद घेतली. सीमेवर दोन देशांच्या सैनिकांमधील चकमकीची सर्व जबाबदारी झाओ यांनी भारतावर टाकली. हे भारताचे प्रक्षोभक कृत्य असल्याचा कांगावाही चीनने केला. ‘भारताने सीमा ओलांडू नये किंवा परिस्थिती आणखी बिघडू शकेल असे एकतर्फी पाऊल उचलू नये’ अशी दर्पोक्तीही त्यांनी केली
संबंधित बातम्या :
Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?
India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?
(India China Face off Martyr Col Santosh Babu Mother Reaction)