शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर नाटकं करणं बाग्लादेशला पडले भारी, पाहा काय घडले..?
नवीन सरकार आल्यानंतर भारत-बांगलादेशातील नाते तणावग्रस्त बनले आहे. त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावर देखील झाला आहे. बांग्लादेश आपला ऐतिहासिक दूश्मन असलेल्या पाकिस्तानशी मैत्री वाढवत आहे आणि भारतापासून दूर चालला आहे. अलिकडेच एका इंग्रजी वृत्तापत्रात आलेल्या बातमीनुसार बांगलादेशातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानकडून माल विकत घेण्यासाठी मजबूर केले जात होते.
बांग्लादेशात विद्यार्थ्यांचा उठाव झाल्याने पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत व्हावे लागले. त्यानंतर भारताने शेख हसीना यांना शरण दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले आहे. परंतू अन्नधान्याची टंचाई आणि वाढती महागाई यामुळे बांग्लादेशला भारतच एकमात्र मित्र उरला आहे. भारताशी तणाव असून बांग्लादेशाची अंतरिम सरकार भारताच्या मदतीच्या आशेवर आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली की बांग्लादेश सरकार भारताकडून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार आहे. आजच गुरुवारी ७०० टन तांदूळ बांग्लादेशात पोहचला आहे. शेख हसीना यांच्या सरकारच्या बरखास्तीनंतर आणि मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भारतातून बांगलादेशात जहाजाद्वारे तांदूळ पाठविण्यात आला आहे.
बांगलादेशातील स्थानिक वृत्तपत्रानुसार स्थानिक बाजारात अन्नधान्याचा कमतरता पूर्ण करण्यासाठी बांग्लादेशाने भारतातून उकडलेला तांदूळ खरेदी केला आहे. हा तांदूळ जहाजाने गुरुवारी चटगांव बंदरात पोहचला आहे. बुधवारी वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की तांदूळ घेऊन भारतीय जहाज MV Tanais Dream सकाळी साडेपाच वाजता बंदरात पोहचणार आहे.
शेख हसीना यांच्या काळात भारत आणि बांगलादेशाचे संबंध मैत्रीचे होते. परंतू जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन होऊन शेख हसीनाचे सरकार उलथवून टाकण्यात आले. शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली एका अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली आहे. या सरकारचे भारताशी वाद होत आहेत. तसेच बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असल्याने देखील दोन्ही देशातील संबंध तणावाचे बनले आहेत.
करारानुसार तांदूळ खरेदी
बांगलादेश आणि भारतात यांच्या ११ नोव्हेंबर रोजी तांदूळ खरेदीशी संबंधित करार झाला होता. या करारानुसार भारतातून बांगलादेशला तांदूळाचा पहिली खेप पोहचली आहे. या आधी बांगलादेशातील स्थानिक वृत्तपत्रात बातम्या आल्या होत्या की देशातील अन्नधान्याच्या टंचाईमुळे अंतरिम सरकार भारताकडून ५० हजार टन तांदूळ सरकारी खाद्य वितरण प्रणालीसाठी खरेदी करणार आहे.देशातील वाढत्या महागाईला तोंड देता यावे म्हणून बांगलादेशातील अंतरिम सरकार गरीबांना दिलासा देण्यासाठी सरकारी खाद्य वितरण कार्यक्रमावर भर देणार आहे.
बांगलादेशच्या खाद्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार १७ डिसेंबरपर्यंत ११.४८ लाख टन धान्य होते. त्यात ७.४२ लाख टन तांदुळाचा समावेश होता. सरकारने या आर्थिक वर्षात १७ डिसेंबरपर्यंत २६.२५ लाख टन धान्य खरेदी केले. त्यात ५४.१७० टन तांदूळ होते. बांगलादेश सरकारच्या योजनेनुसार आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये २०.५२ लाख टन धान्य वितरण करण्याची योजना आहे.