‘कोरोना’ संकटात ‘WHO’ने काय-काय केलं? भारतासह 62 देशांकडून चौकशीची मागणी

कोविड19 साथीच्या रोगासंदर्भात 'जागतिक आरोग्य संघटने'ने केलेल्या उपायांच्या स्वतंत्र तपासणीची मागणी 62 देशांनी केली आहे. (India joins 62 other nations in seeking probe into WHO's COVID-19 response)

'कोरोना' संकटात 'WHO'ने काय-काय केलं? भारतासह 62 देशांकडून चौकशीची मागणी
फोटो : 'जागतिक आरोग्य संघटने'चे डायरेक्टर जनरल टेड्रोस अॅडॅनॉम घेब्रेयसिस
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 11:05 AM

जीनिव्हा : ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (WHO) आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत आणि त्यांची यामागे भूमिका काय, अशा प्रश्नांची उत्तरे ‘कोरोना’चा फटका बसलेले जगभरातील 62 देश शोधत आहेत. भारताने अधिकृतपणे या देशांना पाठिंबा दर्शवला आहे. युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीच्या मागणीच्या कागदपत्रांवर भारताने स्वाक्षरी केली. (India joins 62 other nations in seeking probe into WHO’s COVID19 response)

जागतिक आरोग्य महासभेची (World Health Assembly) 73वी बैठक आज (सोमवार) पासून सुरु होत आहे. या बैठकीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार, भारतासह 62 देशांनी ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियनच्या संयुक्त प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला. या समितीने कोविड19 साथीच्या रोगासंदर्भात ‘जागतिक आरोग्य संघटने’ने केलेल्या उपायांच्या स्वतंत्र तपासणीची मागणी केली आहे.

या मसुद्यात कोरोना व्हायरस संकटाचा निष्पक्ष, स्वतंत्र आणि सर्वंकष तपास करण्याची मागणी केली गेली आहे. याव्यतिरिक्त, कोविड19 चा मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या कामांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : आधी इशारा, आता आदेश, ‘WHO’च्या निधीला डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती

कोरोना व्हायरस जगभर कसा पसरला हे शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियाने गेल्या महिन्यात स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री मेरी पेन यांनी ‘डब्ल्यूएचओ’कडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. “आंतरराष्ट्रीय समुदायांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, जेणेकरुन आगामी साथीच्या रोगाचा सामना वेळेत करता येईल आणि आपले नागरिक सुरक्षित राहू शकतील” असं त्या म्हणाल्या होत्या.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीला जपान, ब्रिटन, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, ब्राझील, कॅनडासारख्या 62 देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. ‘कोरोना’चा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात सापडला होता, मात्र या मसुद्यात चीन किंवा वुहान शहराचा उल्लेख नाही. (India joins 62 other nations in seeking probe into WHO’s COVID19 response)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कोरोना व्हायरस’च्या भीषणतेविषयी चीनचे पोकळ दावे सत्य मानून, माहिती देण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ‘WHO’वर आधीच ठेवला होता. WHO ला पाठवला जाणारा निधी तात्पुरता थांबवण्याचे  आदेश त्यांनी गेल्या महिन्यात दिले होते.

“जागतिक आरोग्य संघटना आपल्या मूलभूत कर्तव्याचं पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे. यासाठी त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे. जर ‘WHO’ ने योग्य वेळेत प्रतिसाद दिला असता, तर ‘कोरोना’चा उद्रेक होण्याऐवजी उगमावेळीच तो आटोक्यात आणता आला असता.’ असं ट्रम्प म्हणाले होते.

(India joins 62 other nations in seeking probe into WHO’s COVID19 response)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.