India Corona Update | कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत चीनच्या पुढे, आकडा 85 हजारांच्या पार

भारतात आज कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 784 च्या वर पोहोचला आहे. तर कोरोना विषाणूचा जिथे जम्न झाला त्या चीनमध्ये सध्या 84 हजार 031 कोरोना रुग्ण आहेत.

India Corona Update | कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत चीनच्या पुढे, आकडा 85 हजारांच्या पार
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 3:45 PM

नवी दिल्ली : भारताने कोरोना रुग्णांच्या संख्येत चीनला (India Surpass China In Total Number Of Corona Patients) मागे टाकलं आहे. भारतात आज कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 784 च्या वर पोहोचला आहे. तर कोरोना विषाणूचा जिथे जम्न झाला त्या चीनमध्ये सध्या 84 हजार 031 कोरोना रुग्ण आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीच्या कोरोना विषाणू रिसोर्स सेंटरने (India Surpass China In Total Number Of Corona Patients) ही माहिती दिली आहे.

चीनमध्ये काल 82 हजार 929 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर भारतात काल 82,085 रुग्ण होते. मात्र, आता हा आकडा वाढून थेट 85 हजार 784 वर पोहोचला आहे. तर चीनमध्ये 84 हजार 031 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच भारतात चीनच्या तुलनेत 1 हजार 753 अधिक रुग्ण आहेत.

भारतात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 649 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 699 रुग्णांची भर पडली आहे. इतकंच नाही तर गेल्या 24 तासात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. भारतात आतापर्यंत 27 हजार 900 जण कोरोनातून बरे झाले (India Surpass China In Total Number Of Corona Patients)आहेत.

भारतात महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट आहे. इथे गेल्या 24 तासात कोरोनाचे 1576 नवे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान, तब्बल 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 29100 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1068 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगात काय स्थिती?

जगात कोरोना रुग्णांचा आकडा 45 लाखाच्या वर पोहोचला आहे. तर यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 3 लाख 7 हजारांच्या पार पोहोचली आहे.

कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत

कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेवर झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 87 हजार 530 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक 14 लाख 42 हजार 819 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

इतर राष्ट्रांची काय स्थिती

  • ब्रिटनमध्ये 2,38,004 कोरोना रुग्ण
  • स्पेनमध्ये 2,30,183 कोरोना रुग्ण
  • इटलीमध्ये 2,23,885 कोरोना रुग्ण
  • ब्राझीलमध्ये 2,18,223 कोरोना रुग्ण
  • फ्रान्समध्ये 1,79,630 कोरोना रुग्ण
  • जर्मनीत 1,75,233 कोरोना रुग्ण
  • तुर्कीत 1,46,457 कोरोना रुग्ण
  • इराणमध्ये 1,16,635 कोरोना रुग्ण

India Surpass China In Total Number Of Corona Patients

संबंधित बातम्या :

हे पहिल्यांदा घडतंय : इंडोनेशियात सोशल डिस्टसिंगचं उल्लंघन केल्यास शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा

कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

“हा प्रश्न चीनला विचार” पत्रकाराला दरडावून डोनाल्ड ट्रम्प यांचा काढता पाय

जगात काय घडतंय? चीनमधील वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 45 दिवसानंतर दाम्पत्याला कोरोनाची बाधा

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.