1 एप्रिलपासून सर्वात शुद्ध पेट्रोल-डिझेल मिळणार, काय काय फायदा होईल?
लवकरच देशात एक महत्त्वपूर्ण बदल होणार (Clean petrol diesel India) आहे. येत्या 1 एप्रिल 2020 पासून भारतात सर्वात शुद्ध पेट्रोल-डिझेल मिळणार आहे.
नवी दिल्ली : लवकरच देशात एक महत्त्वपूर्ण बदल होणार (Clean petrol diesel India) आहे. येत्या 1 एप्रिल 2020 पासून भारतात सर्वात शुद्ध पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. डंडियन ऑईलचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशात 1 एप्रिलपासून यूरो-6 ग्रेडचे पेट्रोल आणि डिझेल मिळणार असून याचा वापर सर्वसामन्यांना करता येणार आहे. यामुळे भारताचे नाव शुद्ध पेट्रोल-डिझेल मिळणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट होणार आहे.
सरकारने येत्या 1 एप्रिलपासून यूरो-6 ग्रेडचे इंधन उत्सर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. यूरो 6 ग्रेडचे इंधन देशभरातील सर्वात शुद्ध पेट्रोल आणि डिझेल मानलं जातं. भारताने केवळ 3 वर्षातच हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तर दुसरीकडे देशातील इतर महत्त्वाचे देश अद्याप इथपर्यंत पोहोचलेले नाहीत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इंडियन ऑईल या कंपनीने देशातील अर्ध्या इंधन बाजारावर मक्तेदारी मिळवली आहे. सर्व रिफायनरीने 2019 च्या वर्षाअखेरीस अल्ट्रा-लो सल्फर बीएस-6 ग्रेडच्या (यूरो-6 ग्रेड च्या बरोबरीचे) पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन करणं सुरु केलं आहे. येत्या 1 एप्रिलपासून भारतात BS-VI इंधनाचा वापर होईल. यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली (Clean petrol diesel India) आहे.”
BS-VI इंधन नेमकं कसं असणार?
संजीव सिंह यांच्या मते, BS-VI या नव्या इंधनामुळे वाहनांमधून उत्सर्जित होणारा नायट्रोजन ऑक्साईड कमी होणार आहे. पेट्रोलचा वापर करणाऱ्या गाड्यांमध्ये 25 टक्के नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल. डिझेल वापरणाऱ्या वाहनांमध्ये 70 टक्के नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल. BS-VI या नव्या इंधनात सल्फरचे प्रमाण 10 PPM इतकी आहे. हे CNG प्रमाणे शुद्ध मानलं जातं.
देशात शुद्ध पेट्रोल-डिझेल मिळाल्याने प्रदूषणात घट होईल. तसेच इंधनाचा वापरही कमी होईल असा दावा केला जात (Clean petrol diesel India) आहे.
पेट्रोल-डिझेल महागणार?
बीएस-6 भारतात गाडी आणि बाईक चालवणे महाग होऊ शकते. येत्या 1 एप्रिलपासून शोरुममध्ये विक्री होणाऱ्या गाड्या आणि बाईकमध्ये बीएस-6 ग्रेडच्या पेट्रोलचा वापर करावा लागणार आहे. तर प्रदूषण कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे बीएस-4 ग्रेडचे पेट्रोल बीएस-6 ग्रेडच्या तुलनेत थोडे महाग असणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या डीलर्सच्या मते, बीएस 6 ग्रेडचे पेट्रोल-डिझेल बनवण्यासाठी लागणारी किंमत जास्त आहे. त्यामुळे या पेट्रोलसाठी सामान्य पेट्रोल-डिझेलच्या किंमतीपेक्षा किमान 1 ते 2 रुपये ग्राहकांना जास्त मोजावे लागण्याची शक्यता (Clean petrol diesel India) आहे.