भारत आणि अमेरिकादरम्यान आज ‘टू प्लस टू चर्चा’, BECA सह महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होणार
भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आणि संरक्षणमंत्र्यांमध्ये आज टू प्लस टू चर्चा होणार आहे. त्यात BECA सह अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. लडाख सीमेवर चीनच्या कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
नवी दिल्ली: अमेरिकेचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांच्या भारत दौऱ्यावेळी अनेक महत्वाचे करणार होणार आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये डाटाशी संबंधित एक महत्वपूर्ण करार होणार आहे. या कराराद्वारे भारत अमेरिकी सैन्स उपग्रहाद्वारे भौगोलिक स्थिती आणि योग्य माहिती प्राप्त करु शकेल. दरम्यान काल अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात झालेल्या बैठकीत अमेरिकेला भारतातील संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. ( India – US will have a two plus two discussion today )
आज BECA करार होणार
भारत आणि अमेरिका यांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची टू प्लस टू बैठक आज होणार आहे. या बैठकीत बेसिक एक्सचेंज अॅन्ड कॉर्पोरेशन एग्रिमेंट अर्थात BECA करारावर हस्ताक्षर होण्याची शक्यता आहे. हा करार भारत आणि अमेरिकेला सशस्त्र मानवरहित आकाश आणि पाण्यातील प्लॅटफॉर्म विकत घेण्यासाठी सक्षम करणारा ठरेल. त्याचबरोबर हा करार दोन्ही देशांमध्ये संरक्षण सामग्री आणि सुरक्षित संचार अधिक सक्षम करणारा ठरणार आहे.
पुढील महिन्यात मालाबार अभ्यास
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे अमेरिकी समकक्ष मार्क एस्पर यांच्या भेटीत होणाऱ्या BECA करार आणि दोन्ही देशांतील सैन्य स्तरावरील चर्चेबाबत समाधान व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर एस्पर यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या मालाबार अभ्यासात ऑस्ट्रेलियाच्या भागिदारीचंही स्वागत केलं आहे.
अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलिया पुढील महिन्यात भारतासोबत उच्चस्तरीय मालाबार नौसैनिक अभ्यास करणार आहेत. 2007 नंतर अमेरिका पहिल्यांदात यात सहभागी होत आहे. मालाबार अभ्यास ही भारत आणि अमेरिकेदरम्यान 1992 पासून सुरु असलेली प्रक्रिया आहे.
संबंधित बातम्या:
देशातील इंचभर जमीनही बळकावू देणार नाही; राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा
India – US will have a two plus two discussion today