चीनमधून वस्तू मागवणाऱ्या उद्योगपतींना भारतीय कस्टम विभागाचा दणका
भारत-चीनमध्ये गलवना खोऱ्यात झालेल्या चकमकीचा फटका भारतीय उद्योगपतींना बसला (Boycott Chinese Product) आहे.
मुंबई : भारत-चीनमध्ये गलवना खोऱ्यात झालेल्या चकमकीचा फटका भारतीय उद्योगपतींना बसला (Boycott Chinese Product) आहे. चीनमधून भारतात मागवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईलचं कंसाईंनमेंट कस्टमच्या गोडाऊनमधे पडून आहे. त्यामुळे उद्योगपतींचे मोठं नुकसान होत (Boycott Chinese Product) आहे.
भारतीय कस्टम विभागाने चीनमधून वस्तू मागवणाऱ्या उद्योगपतींना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे चीनमधून वस्तू मागवताना उद्योगपतींनी विचार करावा यासाठी कस्टम विभागाची ही खेळी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशातील अनेक गोडाऊनमध्ये चीनहून आलेला माल तसाच पडून आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया सेल्लुलर आणि इलेक्ट्रॉनिक गुड्सचे चेअरमन पंकज महींद्रू यांनी केंद्रीय रिव्हेन्यू सचिवांना पत्र लिहिलं आहे.
डीएचएल या कुरिअर कंपनीने चीन, हाँगकाँग आणि मकाओ इथून कुरिअर सर्विसेस रद्द केल्याची माहिती जारी केली आहे. त्यामुळे चीनवरुन मागवलेला माल आता असाचा पडून राहणार असल्याने उद्योगपतींना फटका बसणार आहे.
दरम्यान, चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असं अनेकांनी आपले मत मांडत सांगितले आहे. भारतानेही चीनसोबतचे आर्थिक व्यवहार रद्द केले आहेत. त्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
संबंधित बातम्या :
चीनला 1126 कोटींचा झटका देण्याची भारताची तयारी, RRTS प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता
चीनने भारतीय वाघांना डिवचलं, भारत-चीन वादावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिक्रिया