युद्धभूमीवरील भारतीय नौदलाच्या शक्तीचा ‘ट्रेलर’, लक्ष्याचा अचूक वेध घेणारा व्हिडीओ व्हायरल
भारताच्या नौदलाने युद्धभूमीवरील आपल्या शक्तीचा ट्रेलर जगाला दाखवला आहे.
नवी दिल्ली : भारताच्या नौदलाने युद्धभूमीवरील आपल्या शक्तीचा ट्रेलर जगाला दाखवला आहे. नौदलाने (Indian Navy) युद्धासाठी आपली तयारी दाखवताना अँटी-शिप मिसाईल डागून एक जहाज नष्ट केलं आहे. अरबी समुद्रात केलेल्या या सराव अभ्यासात भारतीय नौदलाच्या मिसाईलचं लक्ष्य अत्यंत अचूक असल्याचं दिसून आलं. भारतीय नौदलाने याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे (Indian Navy demonstrates combat readiness shared video of missile hitting target).
भारतीय नौदलाने या सराव अभ्यासात ‘फ्रंटलाईन कॉरवेट INS प्रबळ’वरुन हे मिसाईल सोडलं होतं. या युद्ध अभ्यासात विमानवाहू युद्धजहाज INS विक्रमादित्य आणि इतर अनेक युद्धजहाजं, लढाऊ हेलिकॉप्टर, विमानं आणि नौदलाच्या अन्य उपकरणांचा समावेश होता. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे, “भारतीय नौदलाने डागलेल्या मिसाईलने जुन्या जहाजाच्या रुपातील आपलं लक्ष्य आपल्या सर्वाधिक रेंजसह अचूकपणे भेदलं. भारतीय नौदलाच्या “फ्रंटलाईन कॉरवेट INS प्रबळ’वरुन हे अँटी-शिप मिसाईल सोडण्यात आलं होतं.”
#AShM launched by #IndianNavy Missile Corvette #INSPrabal, homes on with deadly accuracy at max range, sinking target ship. #StrikeFirst #StrikeHard #StrikeSure #हरकामदेशकेनाम pic.twitter.com/1vkwzdQxQV
— SpokespersonNavy (@indiannavy) October 23, 2020
दरम्यान, भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी गुरुवारी (22 ऑक्टोबर) नौदलाच्या ‘कॅरिअर बॅटल ग्रुप’च्या निवडक अधिकाऱ्यांसोबत INS विक्रमादित्यवरुन केलेल्या प्रसारणाच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी त्यांनी नौदलाच्या युद्धासाठी तयारीचाही आढावा घेतला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅडमिरल सिंह यांनी आपल्या भाषणात मागील काही महिन्यांमध्ये नौदलाकडून सुरु असलेल्या युद्धाच्या तयारीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचं कौतुक केलं होतं.
संबंधित व्हिडीओ :
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस कवरत्ती’, पाणबुडीविरोधी युद्धनौका निर्मितीमध्ये भारताला मोठं यश
INS Arighat | भारताची आण्विक पाणबुडी ‘अरिघात’ सज्ज, पाकिस्तानसह चीनच्या चिंतेत वाढ
गलवान खोऱ्यातील चीनच्या कुरापतीनंतर भारताचं चोख उत्तर, दक्षिण चीन समुद्रात भारतीय युद्धनौका तैनात
Indian Navy demonstrates combat readiness shared video of missile hitting target