भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जींसह पत्नीला नोबेल पुरस्कार
भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी (Nobel Proze to India Origin Economist Abhijit Banerjee) आणि त्यांची पत्नी इस्थर डफ्लो यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
ओस्लो (नॉर्वे) : भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी (Nobel Proze to India Origin Economist Abhijit Banerjee) आणि त्यांची पत्नी इस्थर डफ्लो यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत मायकल क्रेमर यांनाही संयुक्तपणे हा नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांना ‘जागतिक पातळीवर गरीबी निर्मुलनाच्या प्रयोगांमध्ये केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेल्या अभिजीत बॅनर्जी यांना (Nobel Proze to India Origin Economist Abhijit Banerjee) अर्थशास्त्रात हा पुरस्कार मिळाला आहे.
BREAKING NEWS: The 2019 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer “for their experimental approach to alleviating global poverty.”#NobelPrize pic.twitter.com/SuJfPoRe2N
— The Nobel Prize (@NobelPrize) October 14, 2019
बॅनर्जी सध्या मॅसाच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. ते आणि त्यांची पत्नी डिफ्लो ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अॅक्शन लॅब’चे सहसंस्थापक आहेत. बॅनर्जी यांनी 1981 मध्ये कोलकाता विद्यापीठातून बीएससी केली होती. 1983 मध्ये त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून 1988 मध्ये पीएचडी केली.
‘बॅनर्जींच्या संशोधनाने गरिबी निर्मुलनात मोठी मदत’
नोबेल समितीने अभिजीत बॅनर्जी यांना नोबल पुरस्कार देताना त्यांच्या संशोधनाचं महत्त्वही विषद केलं. समितीने सांगितलं, ” अभिजीत बॅनर्जी यांच्या संशोधनामुळे जागतिक गरिबी निर्मुलनाच्या कामात मोठी मदत झाली. मागील 2 दशकांमधील त्यांच्या प्रयोगांवर आधारित पद्धतींमुळे विकासात्मक अर्थशास्त्रात मोठे बदल झाले आहे. यामुळे संशोधन क्षेत्रातही मोठी प्रगती झाली आहे.”