पाकिस्तानी विमानांच्या भारतीय सीमेजवळ घिरट्या, ‘मिराज’ने उड्डाण घेताच धूम ठोकली
इस्लामाबाद : पाकिस्तानचं लढाऊ विमान एफ-16 ने सोमवारी सकाळी तीन वाजता भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला. पाकिस्तानी विमानांसोबतच काही हेरगिरी करणारे ड्रोनही आढळून आले. भारतीय सैन्याबाबत हेरगिरी करण्यासाठी ही विमानं आल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय वायूसेनेच्या सुखोई 30 आणि मिराज 2000 ने हाणून पाडला. पाकिस्तानी ड्रोन भारतीय हवाई सीमेजवळ आढळून आल्याची माहिती आहे. […]
इस्लामाबाद : पाकिस्तानचं लढाऊ विमान एफ-16 ने सोमवारी सकाळी तीन वाजता भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला. पाकिस्तानी विमानांसोबतच काही हेरगिरी करणारे ड्रोनही आढळून आले. भारतीय सैन्याबाबत हेरगिरी करण्यासाठी ही विमानं आल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय वायूसेनेच्या सुखोई 30 आणि मिराज 2000 ने हाणून पाडला.
पाकिस्तानी ड्रोन भारतीय हवाई सीमेजवळ आढळून आल्याची माहिती आहे. यानंतर भारतीय वायूसेनेने तातडीने कारवाईला सुरुवात केली. काही मिनिटात सुखोई 30 आणि मिराज जेटने उड्डाण घेतली. यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी धूम ठोकली. यापूर्वी 13 मार्च रोजीही भारतीय वायूसेनेच्या रडारने पूँछ सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी विमानांना डिटेक्ट केलं होतं.
27 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनीही भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिगने पाकिस्तानचं विमान पाडलं होतं. भारताचंही मिग कोसळल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने अटक केली. यानंतर दोन दिवसातच अभिनंदन यांची सुटका करण्यात आली होती.