“पुढील महिन्यात भारतीय रेल्वेचं खासगीकरण, 250 रेल्वेचा खासगीकरणात समावेश”
भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्माचारी आणि प्रवाशी संघटनेने (Indian railway privatization) याला विरोध केला आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्माचारी आणि प्रवाशी संघटनेने (Indian railway privatization) याला विरोध केला आहे. या खासगीकरणात सुरुवातीला 150 एक्स्प्रेस ट्रेन आणि 100 ट्रेनचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वे प्रवाशी संघटनेचे सदस्य मधू कोटीयन यांनी (Indian railway privatization) दिली आहे.
रेल्वेकडून करण्यात येणाऱ्या खासगीकरणात रेल्वेचे 100 मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात याचे टेंडरही निघणार आहे. या खासगी करणाला अर्थमंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये 100 पैकी 26 मार्ग मुंबईशी निगडीत आहेत. 100 मार्गात मुंबई-नागपूर, पुणे-पाटणा, मुंबई-पुणे, नागपूर-पुणे मार्गाचा समावेश आहे. तर मुंबई ते कोलकाता, चेन्नई, गुवाहटी मार्गाचाही समावेश असेल.
खासगीकरणामुळे सरकारचे यावर नियंत्रण राहणार नाही. प्रवाशांना सुविधेसाठी अधिक पैसेही मोजावे लागणार आहेत. सध्या आयआरसीटीच्या बरोबरीने ज्या सुविधा कमी पैशांत मिळत आहेत त्यालाच अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वे खासगीकरणाला मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि प्रवाशी संघटनेकडून विरोध होत आहे.
“रेल्वेच्या खासगीकरण करण्याकडे वाटचाल सुरु झालेली आहे. पुढच्या महिन्यात याचे टेंडरही मिळेल. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारी सुविधाही खासगीकरण झाल्यावर मिळणार नाही”, असं प्रवाशी संघटनेचे सदस्य मधू कोटीयन यांनी सांगितले.
“दिल्ली-मुंबईच्या तेजस एक्स्प्रेसचे भाडे 800 वरुन 1400 झालेले आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार. त्यामुळे यामध्ये प्रवाशांचा नाहीतर व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. यापुढे प्रत्येक प्रवाशाचा खर्च वाढणार आहे. तर आपल्या मर्जीप्रमाणे हे लोक खासगीकरण करणार आहे. याला आम्ही विरोध करतो”, असंही कोटीयन यांनी सांगितले.