Railway IRCTC | मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?
आजपासून पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील 15 राजधानी मार्गावर 30 फेऱ्या (Indian Railways Special Train Update) धावणार आहेत.
मुंबई : कोरोनामुळे ठप्प असलेली रेल्वेची प्रवासी वाहतूक विशेष (Indian Railways Special Train Update) सेवा आजपासून टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे. दिल्लीला जोडणाऱ्या 15 रेल्वे गाड्या धावणार आहेत. याशिवाय मजुरांसाठी श्रमिक स्पेशल गाड्याही धावणार आहेत. मुंबईतून आज विविध राज्यांसाठी श्रमिक गाड्या धावणार आहेत. तर पुण्यातून पुण्यातून येत्या 8 दिवसात 23 गाड्या सोडण्यात येणार आहेत. नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरांचल, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहे.
लॉकडाऊनमुळे पुण्यात 1 लाख 08 हजार 608 कामगार, मजूर अडकले आहेत. त्यांच्यासाठी पुढील आठ दिवसात परराज्यात 23 रेल्वे सोडण्यात येणार आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरांचल, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. तसेच येत्या दोन दिवसात 150 बसेसही सोडल्या जाणार आहेत, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली.
तर मुंबईतून श्रमिक स्पेशल ट्रेन सुटणार आहे. या पार्श्वभूमीवर हजारो परप्रांतिय मजूरांनी सकाळपासूनच सीएसएमटी परिसरात गर्दी केली. मात्र रेल्वे पोलिसांकडून फक्त आरक्षित तिकीट असलेल्या व्यक्तींना स्टेशनवर सोडलं जात आहे. तसेच या मजूरांना विशेष बसमधून स्टेशनवर आणलं जात आहे.
Indian Railways announces timings of Fifteen pair of special trainshttps://t.co/K8u5OdbkWt pic.twitter.com/riKIbjqpdM
— DD News (@DDNewslive) May 12, 2020
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीसाठी विशेष रेल्वे रवाना होणार आहे. याची जय्यत तयारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर करण्यात आली. सोशल डिस्टिंसिंगसाठी स्टेशनवर ठिकठिकाणी मार्किंग करण्यात आलं आहे. तसेच सर्व प्रवाशांना दीड तास आधीच रेल्वे गाडीत प्रवेश करावा, अशा सूचनाही देण्यात येत आहेत.
त्याशिवाय सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अॅपचीही सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य सेतू अॅप असल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला प्रवास करता येणार नाही, असे पत्रक रेल्वेने जाहीर केले आहे.
‘या’ गोष्टी प्रवाशांसाठी महत्त्वाच्या
- प्रवाशांना 90 मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचणे गरजेचे
- प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य
- वेटिंग किंवा आरएसी तिकीट नाही
- तिकीट रद्द केल्यास केवळ 50 टक्के पैसे रिटर्न
- प्रवासादरम्यान चादर आणि उशी मिळणार नाही
15 मोठ्या शहरांमधून रेल्वेगाड्या
आजपासून पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील 15 राजधानी मार्गावर 30 फेऱ्या धावणार आहेत. या विशेष रेल्वे नवी दिल्ली (दिबरुगड), आगरताळा, हावरा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवी या 15 शहरांमधून सुटणार आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकावरुन संध्याकाळी 5.30 वाजता दिल्लीला पहिली ट्रेन रवाना होणार आहे. तर दिल्ली स्थानकावरुन संध्याकाळी 4.55 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन उद्या सकाळी 8.45 ला मुंबईत पोहोचणार आहे. ही गाडी सुरत, वडोदरा, रतलाम आणि कोटा या स्थानकावर थांबेल.
विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक जाहीर :
- 15 रेल्वे गाड्यांच्या 30 फेऱ्या उद्यापासून सुरु होणार
- 02951 मुंबई सेंट्रल ते दिल्ली संध्या. 5.30 ला निघणार
- 02952 दिल्ली ते मुंबई सेंट्रल संध्या 4.55 ला निघणार
- 02413 मडगाव ते दिल्ली स. 10.30 वा. निघणार
- 02414 दिल्ली ते मडगाव स.11.25 ला निघणार
As per the railway officials, total 45,533 PNRs have been generated and reservation issued to 82,317 passengers for special trains. The total collection is Rs 16,15,63,821 pic.twitter.com/O1u83CnepP
— ANI (@ANI) May 12, 2020
रेल्वे बुकिंगमधून 10 कोटींचा महसूल
या गाड्यांच्या आरक्षणासाठी आयआरसीटीसीच्या https://www.irctc.co.in/ या वेबसाईटवर 11 मे पासून संध्याकाळी 4 वाजता सुरु झाले. मात्र त्यावेळी वेबसाईट क्रश झाली. त्यानंतर संध्याकाळी 6 पासून रेल्वेचे आरक्षण सुरु झाले. आरक्षण सुरु झाल्यानंतर पुढे काही मिनिटातच 18 मे पर्यंत सर्व गाड्यांच्या आरक्षण फुल्ल झाले. सोमवारी तीन तासात 54 हजार प्रवाशांपैकी 30 हजार तिकिटं बुक झाली. विशेष म्हणजे या बुकिंगमधून रेल्वेला 10 कोटींचा (Indian Railways Special Train Update) महसूल मिळाला.
संबंधित बातम्या :
मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई दररोज रेल्वे, कन्फर्म तिकीट हाच पास, टीसीकडून तिकीट मिळणार नाही
मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट बुकिंग, रेल्वे प्रवाशांसाठी गृह मंत्रालयाची नियमावली जारी
देशातील प्रवासी रेल्वे 12 मे पासून सुरु होणार, रेल्वेचा मोठा निर्णय