Indian Special Force | पाकिस्ताननंतर टार्गेट चीन, ‘सर्जिकल स्ट्राईक’ची स्पेशल फोर्स पुन्हा रणांगणात

स्पेशल फोर्स चिनी सैन्याविरोधात उतरवली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्पेशल फोर्सची तुकडी लडाखमध्ये तैनात केली गेली.

Indian Special Force | पाकिस्ताननंतर टार्गेट चीन, 'सर्जिकल स्ट्राईक'ची स्पेशल फोर्स पुन्हा रणांगणात
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 11:18 PM

मुंबई : बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण जरी आली (Indian Special Force), तरी पाकिस्तानच्या अंगावर अजूनही शहारे येतात. भारताच्या स्पेशल फोर्सनं शेकडो किलोमीटर दूर जाऊन दहशतवाद्यांना त्यांच्या मनसुब्यांसकट जमिनीत गाडलं होतं (Indian Special Force).

आता तीच स्पेशल फोर्स चिनी सैन्याविरोधात उतरवली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्पेशल फोर्सची तुकडी लडाखमध्ये तैनात केली गेली. सध्या देशात स्पेशल फोर्सच्या 12 हून जास्त रेजिमेंट आहेत. त्यामुळे जर गरज भासली तर वेगवेगळ्या भागांमध्ये स्पेशल फोर्सचे जवान तैनात केले जाऊ शकतात.

भारत-चीनमध्ये दुसऱ्या पातळीवर चर्चा जरी सुरु असली, तरी स्पेशल फोर्सला तैनात करुन भारतानं चीनला अप्रत्यक्षपणे कडक संदेश दिला. 30 जूनला चुशूलमध्ये कमांडर्सच्या पातळीवर खलबतं झाली. तब्बल 12 तास चाललेल्या या बैठकीत काही मुद्द्यांवर एकमत झालं. मात्र, ज्या मुद्यांवर अजूनही वाद आहेत, तिथून भारतीय सैन्यानं एकही पाऊल मागे घेतलेलं नाही (Indian Special Force).

चर्चेच्या आडून विश्वासघात करण्याचा चीनचा इतिहास राहिला आहे. 6 जूनला सुद्धा कमांडर पातळीवर मिटिंग झाली होती. दोन्हीकडचं सैन्य वादाच्या मुद्यांवरुन मागे हटवण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झालं. मात्र, चीनी सैनिक मागे हटण्याऐवजी लडाखच्या भूमीवरच राहिले. दुसरीकडे, चीननं एलएसीवर 20 हजार सैनिकांचीही कुमक मागवून ठेवली. त्यामुळे भारतालाही आपली स्पेशल फोर्सला मैदानात उतारावी लागली आहे.

भारताच्या स्पेशल फोर्सचं ट्रेनिंग हे जगातल्या सर्वात अवघड ट्रेनिंगपैकी एक असतं. ऊन-वारा-थंडी अशा कोणत्याही भौगोलिक वातावरणात राहण्याचं आणि प्रसंगी शत्रुशी दोन हात करण्याचं प्रशिक्षण जवानांना दिलं जातं. सियाचीनमधल्या भारताच्या स्पेशल जवानांचं खुद्द चीननंच अनेकदा कौतुक केलं. ज्या वातावरणात नुसतं साधा श्वास घेणं सुद्धा अवघड आहे, तिथं भारतीय जवान देशाची रक्षा करत आहेत. चीनकडे भलेही मार्शल आर्ट्सनी प्रशिक्षित सैनिकांच्या तुकड्या असतील. पण भारताची स्पेशल फोर्स म्हणजे तावून सुलाखून निघालेलं एक पोलाद आहे (Indian Special Force).

संबंधित बातम्या :

PM Modi at Nimu | जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, लडाखमध्ये पंतप्रधान मोदींचे जवानांना नमन

भारतीय उद्योगपतीचा झटका, चीनला तब्बल 3000 कोटी रुपयांचा फटका

PM Modi in Leh | पंतप्रधानांचा लेह-लडाख दौरा, नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे 10 महत्त्वाचे मुद्दे

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.