Food | भारतीय आहारात पूर्णान्न ‘खिचडी’ला विशेष महत्त्व, वाचा खिचडी खाण्याचे फायदे!

पचनास हलकी असणारी ‘खिचडी’ इतर ऋतूंप्रमाणेच हिवाळ्याच्या काळातही पोटासाठी लाभदायक ठरते.

Food | भारतीय आहारात पूर्णान्न ‘खिचडी’ला विशेष महत्त्व, वाचा खिचडी खाण्याचे फायदे!
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 4:31 PM

मुंबई : खिचडी ही भारतातील लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. भारतीय लोक डाळ व तांदूळ एकत्र करून आणि त्यात तूप, भाज्या आणि मसाले वगैरे घालून ‘खिचडी’ (Indian Whole meal Khichadi) बनवतात. हिवाळ्याच्या ऋतूत हवामानात बरेच बदल होतात. हवामानाप्रमाणेच आपल्या शरीरात आणि जीवनशैलीत देखील बदल घडत असतात. अशा परिस्थितीत आपल्याला हिवाळ्याच्या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजेत. पचनास हलकी असणारी ‘खिचडी’ इतर ऋतूंप्रमाणेच हिवाळ्याच्या काळातही पोटासाठी लाभदायक ठरते. हिवाळ्याच्या हंगामात खिचडी खाण्याचे अनेक फायदे होतात.(Indian Whole meal Khichadi good for health)

भारतात बनवल्या जाणऱ्या खिचडीमध्ये कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे, पाणी आणि फायबर सारख्या बर्‍याच पौष्टिक पदार्थांचा समावेश केला जातो. भारतीय खिचडी दही, पापड, तूप आणि लोणचे इत्यादींसह दिले जातात. जर, खिचडी बरोबर दही, पापड, तूप आणि लोणचे असेल, तर ती अधिकच स्वादिष्ट लागते.

खिचडीचे फायदे

पौष्टिक पूर्णान्न असणारी खिचडी पोटासाठीही लाभदायक असते. खिचडी खाल्ल्याने अपचनाचा त्रास कमी होतो. जर, वजन कमी करायचे असेल तर, खिचडी खाणे उपयुक्त ठरते. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील खिचडी लाभदायक ठरते. खिचडी वात, पित्ता आणि कफापासून बचाव करण्यासाठीही मदत करते. याशिवाय खिचडी खाल्ल्याने शरीरातील डिटॉक्सही दूर होतो.(Indian Whole meal Khichadi good for health)

खिचडीचे प्रकार

‘खिचडी’ असे नुसते उच्चारले तरी अनेक प्रकारच्या खिचडी आपल्या डोळ्यांसमोर तरळतात. भारतात खिचडीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ‘मुग डाळ खिचडी’, ‘तूर डाळ खिचडी’, ‘संपूर्ण धान्य खिचडी’, ‘आयुर्वेद खिचडी’, ‘मसालेदार खिचडी’, ‘ड्रायफ्रूट खिचडी’, ‘बाजरीची खिचडी’ आणि ‘दही खिचडी’ हे पूर्णान्न खिचडीचे महत्त्वाचे प्रकार आहेत.(Indian Whole meal Khichadi good for health)

हिवाळ्यातही लाभदायक

हिवाळ्याच्या मौसमात बऱ्याच जणांना अपचनाची समस्या होते. जर, वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास ‘खिचडी’ खाणे फादेशीर ठरते. हिवाळ्याच्या हंगामात खिचडी पाचन तंत्राला बळकट करते. जर, तुम्ही उन्हाळ्यात खिचडी खात असाल तर, त्या बरोबर दही आवश्य खावे. दररोज वेगवेगळ्या डाळींची आणि सोयाबीनची खिचडी खाल्ल्याने याचा फायदा होतो.

आजारपणात बळ देणारे ‘पूर्णान्न’

अनेक लोकांना हिवाळी हंगामात थंडी, कफ, ताप, अशक्तपणा  अशा तक्रार उद्भवत असतात. अशा आजारपणात अन्न खाणेदेखील कठीण होते. त्यावेळी नरम, मऊसूत खिचडी शरीराला बळ देते. यामुळे, आपल्याला त्वरीत बरे वाटायला लागते आणि शरीरात ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते. वर्षाच्या कुठल्याही ऋतूत, कोणत्याही महिन्यात अगदी झटपट शिजणार आणि पचनास हलकी असणारी ‘खिचडी’ खऱ्या अर्थाने पूर्णान्न ठरते.

(Indian Whole meal Khichadi good for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.