शिर्डी : इंदोरीकर महाराजांवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाला. मुला-मुलीच्या जन्माविषयी मार्च महिन्यात वादग्रस्त वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराजांवर टीकेची झोड उठली होती. (Indorikar Maharaj Case Filed in Sangamner Court PCPNDT act)
सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.
जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून संगमनेर कोर्टात PCPNDT अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.
इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते?
इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”
अहमदनगर : इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल, सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल, मुला-मुलीच्या जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने टीकेची झोड https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/roMbJ8oACa
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2020
संबंधित बातम्या
माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज
राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा
आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न
आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज
(Indorikar Maharaj Case Filed in Sangamner Court PCPNDT act)