PHOTO : … म्हणून मुख्यमंत्र्यांनी इंदुरीकर महाराजांसमोर हात जोडले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेला उपस्थित राहून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar maharaj cm devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचं योगदान दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडून इंदुरीकर महाराजांचे आभार मानले.
1 / 9
शिर्डी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेला उपस्थित राहून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचं योगदान दिलं.
2 / 9
यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडून इंदुरीकर महाराजांचे आभार मानले.
3 / 9
नगर जिल्हयातील अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे जाहीर सभा, तर महाजनादेश यात्रेच्या मार्गावरही ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
4 / 9
अकोले येथे झालेल्या सभेत ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.
5 / 9
पुढील 25 वर्ष विरोधक सत्तेत येत नाहीत. त्यांनी विरोधक म्हणून अभ्यास करावा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रेवर टीका केली.
6 / 9
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या जाहीर सभेत "अब हवा करेगी रोशनी का फैसला" अशा शायरीने मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात केली. निळवंडे धरणाच्या अपूर्ण कालव्यांचं काम भाजप सरकारच मार्गी लावेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
7 / 9
विखे -थोरात राजकीय संघर्ष पाहता थोरातांच्या बालेकिल्ल्यात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीही थोरातांवर खास शैलीत टीका केली.
8 / 9
अब की बार 220 पार आणि त्यात संगमनेरलाही युतीचाच आमदार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संगमनेरातील जनता भोळी-भाबडी असून जनतेच्या वाटेला फक्त आश्वासनेच मिळाली आहेत. तालुका दुष्काळमुक्त करण्यासोबत दहशतवाद मुक्त करणार, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांवर केली.
9 / 9
शनिवारी महाजनादेश यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.