Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना कोरोना पाठोपाठ ‘एमआयएस-सी’चाही धोका; जाणून घ्या नेमकी काय आहे चिंता

कोरोना संक्रमणातून बाहेर पडल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी मुलांच्या शरिरात या संक्रमणाचा शिरकाव होण्यास सुरुवात होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (Infants are also at risk of ‘MIS-C’ following corona; Know exactly what anxiety is)

लहान मुलांना कोरोना पाठोपाठ ‘एमआयएस-सी’चाही धोका; जाणून घ्या नेमकी काय आहे चिंता
लहान मुलांना कोरोना पाठोपाठ ‘एमआयएस-सी’चाही धोका
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 11:13 PM

नवी दिल्ली : आधीच कोरोना महामारीचे संकट, त्यामागून आलेल्या नवनव्या घातक फंगसमुळे भारताची चिंता दिवसेंदिवस वाढतेच आहे. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे उतरणीला लागली आहे. या लाटेचा धोका पूर्णपणे कमी होत नाही तोच फंगसचा धोका वाढला आहे. आधी ब्लॅक, नंतर व्हाईट फंगस पाठोपाठ आता येलो फंगसचाही रुग्ण आढळल्यामुळे फंगसची नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. याचदरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट डोक्यावर घोंघावते आहे. यात सर्वाधिक धोका लहान मुलांना संभावत असल्यामुळे पालकांची काळजी प्रचंड वाढली आहे. पोस्ट-कोविड कॉम्प्लीकेशन मेडिकल फ्रॅटर्निटीदरम्यान चिंतेचे एक धोकादायक कारण समोर आले आहे. हे संक्रमण मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमच्या (एमआयएस-सी) रुपात मानले जात आहे. कोरोना संक्रमणातून बाहेर पडल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी मुलांच्या शरिरात या संक्रमणाचा शिरकाव होण्यास सुरुवात होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (Infants are also at risk of ‘MIS-C’ following corona; Know exactly what anxiety is)

अँटीबॉडी विकसित झाल्यानंतर अंतर्गत अवयवांना अॅलर्जी येते

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी) मुलांच्या हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम करू शकते. फोर्टिस हेल्थकेअरचे बाल देखभाल तज्ज्ञ डॉ. योगेश कुमार गुप्ता यांच्या मते, मुलांच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग झाल्यास या अवयवांमध्ये सूज येत नाही. हे सिंड्रोम दुर्मिळ आहे. ज्यावेळी कोरोनाचा संसर्ग नष्ट होतो आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी लहान मुलांच्या शरीरात अ‍ॅण्टी बॉडी विकसित होतात, त्यावेळी मुलांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना अ‍ॅलर्जीची सुरुवात होते.

एमआयएस-सी सारख्या कॉम्प्लिकेशनपासून काळजी घेतली पाहिजे

कोरोनाच्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत, असे बाल देखभाल तज्ज्ञ डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. कोरोनाचा कहर ओसरू लागलेल्या देशांमध्ये एमआयएस-सी कॉम्प्लिकेशनचे परिणाम पाहायला मिळत आहे. याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम अर्थात एमआयएस-सी यांसारख्या कॉम्प्लिकेशनपासून काळजी घेतली पाहिजे.

याबाबत पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे एक महामारी तज्ज्ञ आणि कर्नाटकातील कोविड तंत्र सल्लागार समितीचे सदस्य डॉ. गिरीधर आर. बाबू यांनीही सावधगिरीचा सल्ला दिला आहे. कोरोनाची पुढची म्हणजेच तिसरी लाट देशावर धडकण्याआधीच आपल्याला ‘एमआयएस-सी’बाबत सावधगिरी बाळगण्यास वेळ मिळाला आहे. सध्या ‘एमआयएस-सी’चे प्रमाण कमी आहे. इतक्या कमी प्रमाणातच आपल्याला या कॉम्प्लिेकेशनबाबत अधिक विचार व काळजी करण्याची गरज आहे, असे डॉ. बाबू यांनी म्हटले आहे.

लहान मुलांची काळजी घेण्याची गरज

कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरे जाताना आपल्या आरोग्य यंत्रणेची प्रचंड दमछाक झाली आहे. आरोग्य सुविधांतील बऱ्याच त्रुटी आपल्या निदर्शनास आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे बरीच आव्हाने उभी ठाकली आहेत. सुरुवातीच्या दोन लाटांमध्ये आधी वृद्ध आणि नंतर तरुण मंडळी विषाणू संसर्गाच्या तडाख्यात सापडली. यात आपण मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक गमावले आहेत. आता तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजली असतानाच लहान मुलांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. (Infants are also at risk of ‘MIS-C’ following corona; Know exactly what anxiety is)

इतर बातम्या

नागालँडमधील चकमकीत गोंदियाचे जवान प्रमोद कापगते यांना वीरमरण, सेवा निवृत्तीच्या 15 दिवस आधी शहीदत्व

CBI Director appointment | महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक राहिलेले सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.