बंगळुरु : कोरोना विषणूची दहशत (Corona Virus) संपूर्ण देशभर पाहायला (Infosys Employee Facebook Post) मिळत आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा कहर वाढत चालला आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा बळी या कोरोनाने घेतला आहे. तरीसुद्धा काही लोकांना याचं गांभीर्य अद्याप लक्षात आलेलं नाही. अनेकजण या संसर्गजन्य जीवघेण्या आजाराला मस्करीत घेत आहेत. असाच एक प्रयोग (Infosys Employee Facebook Post) बंगरुळुतील इन्फोसिसच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने केला आणि त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.
या सॉफ्टवेअर इंजिनिअरने लोकांना सार्वजनिक ठिकाणांवर शिंकण्यास आणि कोरोना विषाणू पसरवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर त्याने ही पोस्ट केली. त्यानंतर कंपनीने बक्षीस म्हणून त्याची हकालपट्टी केली.
टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीने जेव्हा ही पोस्ट केली, तेव्हा सुरुवातीला कंपनीला वाटलं की ती व्यक्ती इन्फोसिसमध्ये काम करत नसेल. मात्र, थोडी तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर कंपनीने त्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करत त्याला निलंबित केलं. या इंजिनिअरचं नाव मुजीब मोहम्मद आहे.
Infosys has completed its investigation on the social media post by one of its employees and we believe that this is not a case of mistaken identity. (1/2)
— Infosys (@Infosys) March 27, 2020
हे प्रकरण समोर आल्यानंतर इन्फोसिसने स्पष्ट केलं की, त्यांनी मुजीबला कंपनीतून काढलं आहे. ही माहिती कंपनीने शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत दिली. (Infosys Employee Facebook Post) “इन्फोसिसने त्यांच्या एका कर्मचाऱ्याकडून सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर तपास पूर्ण झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे प्रकरण चुकीच्या ओळखीचं नाही”
ट्विटमध्ये इन्फोसिसने म्हटलं, आरोपी इंजिनिअरने जे सोशल मीडियावर लिहिलं, ती पोस्ट इन्फोसिसच्या आचार संहिता आणि कंपनीच्या जबाबदार सामाजिक भागीदारीच्या बांधिलकीच्या विरोधात आहे. “इन्फोसिसचे धोरण असे उपक्रम सहन करण्याचे अजिबात नाही आणि त्यानुसार त्या इंजिनिअरच्या सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.”
मुजीब मोहम्मदची नेमकी पोस्ट काय?
मुजीब मोहम्मद ने फेसबुकवर (Facebook) पोस्ट करत म्हटलं, “चला हात मिळवू, बाहेर जाऊ आणि उघड्यावर शिंकू. विषाणूला आणखी पसरवू”. या पोस्टनंतर त्याला (Infosys Employee Facebook Post) अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या :
Ratan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत
मे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत घरीच थांबा
घराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश