12 वर्षीय मुलावर अमानवीय अत्याचार, स्क्रू ड्रायव्हरने पोटावर मारहाण
मध्य प्रदेशातील एका अल्पवयीन मुलावर अमानवीय कृत्य (Inhuman torture) घडल्याचे समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना बैतूर जिल्ह्यातील छिंदी गावात घडली.
भोपाळ : मध्य प्रदेशातील एका अल्पवयीन मुलावर अमानवीय कृत्य (Inhuman torture) घडल्याचे समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना बैतूर जिल्ह्यातील छिंदी गावात घडली. 12 वर्षाच्या मुलाला रशीने बांधून त्याच्या पोटावर स्क्रू ड्रायव्हरने (Screwdriver) मारण्यात आले. तसेच त्याला शॉकही देण्यात आले. तब्बल पाच तास असा या मुलावर अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत गुन्हा दाखल केला आहे.
छिंदी गावात 1 सप्टेंबर रोजी 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला गावातील काही लोकांनी उचलून शेतात नेले आणि त्याला रशीने बांधून त्याच्यावर अत्याचार केले, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळत आहे.
“पाच तास मला बांधून ठेवले होते आणि माझ्या पोटावर स्क्रू ड्रायव्हरने मारले. मला त्यांनी इलेक्ट्रिक शॉकही दिला. जेव्हा संध्याकाळी माझे नातेवाईक आले तेव्हा मला सोडले. पाच तास त्यांनी मला मारहाण केली. मोबाईल चोरीच्या संशयामुळे त्यांनी मला मारहाण केली”, असं 12 वर्षाच्या मुलाने पोलिसांना सांगितले.
स्क्रू ड्रायव्हरने पोटावर मारण्यात आले होते. त्यामुळे पोटावर जखम दिसत होत्या. या जखमा पाहून समजू शकते की, मुलाला कशा प्रकारे त्रास देण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित मुलाच्या तक्रारीनुसार छिंदी गावातील रुप सिंह रघुवंशी आणि कैलाश रघुवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.