उस्मानाबादच्या पठ्ठ्यासाठी 3 संघ भिडले, राजवर्धनला कॅप्टनपेक्षा तगडा भाव! असं नेमकं काय आहे त्यात खास?

IPL Auction 2022 : अंडर-19 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात राजवर्धनने 38 धावांत एक विकेट घेतली होती. यानंतर आयर्लंडविरुद्ध त्याने 17 धावांत एक विकेट घेतली आणि नाबाद 39 धावा केल्या. युगांडाविरुद्ध त्याने आठ धावांत दोन बळी घेतले.

उस्मानाबादच्या पठ्ठ्यासाठी 3 संघ भिडले, राजवर्धनला कॅप्टनपेक्षा तगडा भाव! असं नेमकं काय आहे त्यात खास?
Rajvardhan Hangargekar (BCCI photo)
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 12:14 PM

मुंबई : वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी आयपीएल लिलावात मोठमोठ्या बोली लागल्याचं रविवारी पाहायला मिळालं. भारताच्या विश्वचषक विजेत्या अंडर-19 संघाचा सदस्य असलेल्या राजवर्धन हंगर्गेकरला (Rajvardhan Hangargekar) त्याचा पहिला IPL संघ मिळाला आहे. IPL-2022 च्या महा लिलावात (IPL-2022 Mega Auction) या गोलंदाजाने त्याची बेस प्राईस 30 लाख रुपये इतकी ठेवली होती. महेद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 1.50 कोटी रुपयांची बोली लावत या खेळाडूचा आपल्या ताफ्यात समावेश केला. मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूसाठी बोली लावली होती, पण चेन्नई आणि लखनौ सुपरजायंट्सने या खेळाडूवर अधिक विश्वास दाखवला. या दोन चेन्नई आणि लखनौमधलं बिडींग वॉर 1.50 कोटी रुपयांपर्यंत गेलं.

राजवर्धनला संघात घेण्यासाठी सर्वात आधी मुंबई इंडियन्सने बोली लावली होती. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने या लिलावात उडी घेतली. मुंबई इंडियन्स आणि लखनौमध्ये काही वेळ जुगलबंदी झाली. त्यानंतर अचानक चेन्नई सुपरकिंग्जने या लिलावात एंट्री घेतली. राजवर्धनसाठीचं बिडींग वॉर 90 लाखांच्या पुढे गेल्यावर मुंबईने माघार घेतली. मग लखनौ आणि चेन्नईमध्ये बिडींग वॉर सुरु झालं. शेवटी चेन्नई सुपरकिंग्जने तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांच्या बोलीवर या नव्या दमाच्या वेगवान गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले. राजवर्धन आता आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. अंडर-19 संघातल्या बऱ्याच खेळाडूंनी लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं होतं. यामध्ये अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुलदेखील होता. दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या बोलीवर या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं.

धडाकेबाज खेळाडू

राजवर्धन हंगर्गेकर हा खेळाडू मूळचा धाराशीवचा आहे. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या राजवर्धनने युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजीतही योगदान दिले. या स्पर्धेत सहा सामन्यांमध्ये त्याने 5 बळी घेतले. आयर्लंडकिरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने 17 चेंडूंत 5 षटकार व एका चौकारासह 39 धावा फटकावल्या. गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजी करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असल्याने चेन्नई संघाने त्याला आपल्या संघात घेण्यात रस दाखवला.

राजवर्धनची विश्वचषकातली कामगिरी

अंडर-19 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात राजवर्धनने 38 धावांत एक विकेट घेतली होती. यानंतर आयर्लंडविरुद्ध त्याने 17 धावांत एक विकेट घेतली आणि नाबाद 39 धावा केल्या. युगांडाविरुद्ध त्याने आठ धावांत दोन बळी घेतले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने बांगलादेशच्या एका फलंदाजाला बाद केले. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला एकही विकेट घेता आली नाही. फायनलमध्येही त्याला इंग्लंडविरुद्ध विकेट मिळाली नव्हती.

असा होता राजवर्धनचा प्रवास

राजवर्धन हा महाराष्ट्रातील तुळजापूर शहरातला रहिवासी आहे. त्याच्या गावात, तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करत होता. परंतु वयाच्या 14 व्या वर्षी तो वेगवान गोलंदाज बनला. 2016-17 च्या विजय मर्चंट ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली होती. येथून तो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच तेजस मातापूरकर यांच्या नजरेत आला आणि त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत 141.7 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. राजवर्धनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले आहे. पाच लिस्ट ए सामन्यात त्याने 10 विकेट घेतल्या आहेत. आता त्याला 19 वर्षांखालील विश्वचषकानंतर भारतीय संघाचा भाग व्हायचे आहे.

इतर बातम्या

खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?

DC IPL 2022 Auction: ‘त्या’ माणसाने किंमत वाढवून दुसऱ्यांची पर्स रिकामी केली पण स्वत: कमी बजेटमध्ये बांधला दिल्लीचा उत्तम संघ

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.