जे.जे. पुलावर झाला मोर्चावर पुष्पवर्षाव
मुंबई : महाविकास आघाडीने सरकारविरोधात पुकारलेल्या या हल्लाबोल मोर्चात जे.जे. पुलावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. या मोर्चात अनेक पक्षांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षांचाही सहभाग आहे. हा मोर्चा जेव्हा जे.जे. पुलावरून जात होता, त्यावेळी एका घरातून मोर्चावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. ही मुस्लीम महिला आणि तिच्या घरातील व्यक्ती मोर्चेकऱ्यांवर अक्षरश: फुलांचा वर्षाव […]
मुंबई : महाविकास आघाडीने सरकारविरोधात पुकारलेल्या या हल्लाबोल मोर्चात जे.जे. पुलावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. या मोर्चात अनेक पक्षांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षांचाही सहभाग आहे. हा मोर्चा जेव्हा जे.जे. पुलावरून जात होता, त्यावेळी एका घरातून मोर्चावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. ही मुस्लीम महिला आणि तिच्या घरातील व्यक्ती मोर्चेकऱ्यांवर अक्षरश: फुलांचा वर्षाव करीत होते. अशाप्रकारे फुलांचा वर्षाव याआधी कधी मोर्चावर झाल्याचे ऐकीवात नसल्याने साऱ्यांच्या नजरा या मुस्लीम कुटुंबियांकडे जात होत्या आणि मोर्चातील हा क्षण वेगळाच ठरला. याआधी या परीसरात लालबागच्या राजाच्या मिरवणूकीत मुस्लीम बांधवांकडून पुष्पवर्षाव केला जात असतो, परंतू एखादा राजकीय पक्षाच्या मोर्चाला पहील्यांदाच पुष्पवर्षाव झाल्याचा प्रकार घडला आहे.