Jaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा

कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते.

Jaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 3:35 PM

मुंबई : ‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे  गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांनी जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जान सानूसह हा वाद आता कलर्स वाहिनीच्याही (Colors TV) अंगाशी येणार होता. मात्र, आता कलर्स वाहिनीने नमते घेत, आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे. (Jaan Kumar Sanu Controversy Colors TV apologies)

कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते, याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे वाहिनीकडून म्हटले गेले आहे.

कलर्स टीव्हीचा माफीनामा!

या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने यां पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.

आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत.

मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.’(Jaan Kumar Sanu Controversy Colors TV apologies)

काय आहे प्रकरण?

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

जान सानू विरोधात आक्रमक भूमिका!

जान कुमार सानूचे मराठी भाषेसंदर्भातले हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झाले. या वक्तव्यामुळे समस्त मराठी प्रेक्षकांची मने दुखावली गेली आहेत. सगळ्याच मराठी प्रेक्षकांनी जान कुमार सानूवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मनसेनेही यावरून जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या या वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी जानला कार्यक्रमातून न हटवल्यास, कार्यक्रम बंद पडण्याचा इशारा दिला होता. मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी देखील ‘आता कुमार सानूची ‘जान’ वाचणे कठीण’, असे म्हणत त्याच्यावर टीका केली होती.

(Jaan Kumar Sanu Controversy Colors TV apologies)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.