Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaan Kumar Sanu Controversy | आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण : शालिनी ठाकरे

मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी देखील आता जान कुमार सानूला या संदर्भात इशारा दिला आहे.

Jaan Kumar Sanu Controversy | आता कुमार सानूची 'जान' वाचणं कठीण : शालिनी ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 2:21 PM

मुंबई : ‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे आता गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात पडणार आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांनी जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जान सानूसह हा वाद आता कलर्स वाहिनीच्याही (Colors TV) अंगाशी येणार आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी देखील आता जान कुमार सानूला या संदर्भात इशारा दिला आहे. (Jaan Kumar Sanu Controversy Shalini Thackeray warns bigg boss contestant)

‘मराठीचा अपमान केलास… आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!’, असे ट्विट करत त्यांनी जान कुमार सानूला कडक इशारा दिला आहे. जान च्या वक्तव्यानंतर मराठी प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. महाराष्ट्रात काम करून, मराठी बद्दल अपमानकारक शब्द वापरणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला जाणार असल्याचे मनसेने म्हटले आहे.

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

काय आहे प्रकरण?

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला. (Jaan Kumar Sanu Controversy Shalini Thackeray warns bigg boss contestant)

मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..

जान कुमार सानूचे हे वक्तव्य सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. या वक्तव्यामुळे समस्त मराठी प्रेक्षकांची मने दुखावली गेली आहेत. सगळ्याच मराठी प्रेक्षकांनी जान कुमार सानूवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मनसेनेही यावरून जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या या वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

‘जान कुमार सानू…मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी…मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,’ असे ट्विट करत अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

हेही वाचा : ‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

(Jaan Kumar Sanu Controversy Shalini Thackeray warns bigg boss contestant)

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.