जळगावभोवती कोरोनाचा विळखा, एकाच दिवसात 19 नवे रुग्ण, एकूण आकडा 85 वर, मृतांचा आकडाही वाढला

जळगाव जिल्ह्यात आज (6 मे) आणखी 19 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे (Jalgaon Corona Updates News).

जळगावभोवती कोरोनाचा विळखा, एकाच दिवसात 19 नवे रुग्ण, एकूण आकडा 85 वर, मृतांचा आकडाही वाढला
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 10:35 PM

जळगाव : कोरोना विषाणूने ग्रामीण भागाच्या भोवती देखील आपला विळखा घालण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात आज (6 मे) आणखी 19 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे (Jalgaon Corona Updates News). यासह जळगावमधील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 85 वर गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या काळजीत भर पडली आहे.

जळगावमध्ये आज एकूण 84 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यापैकी 65 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून 19 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा आणि अमळनेर येथील 18 व्यक्तींचा समावेश आहे. 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज (6 मे) कोरोनाच्या 1,233 नव्या रुग्णांची (Maharashtra New Corona Cases) नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 झाली आहे. आज राज्यात 275 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 3 हजार 094 रुग्ण (Maharashtra New Corona Cases) बरे झाले आहेत.

राज्यात दिवसभरात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 651 वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृत्यूमध्ये मुंबईमधील 25, पुण्यातील 3, अकोला शहरातील 3, जळगावमधील 1 आणि सोलापुरातील एकाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Upadte | राज्यात दिवसभरात कोरोनाचे 1,233 नवे रुग्ण, आकडा 17 हजारच्या उंबरठ्यावर

एका दिवशी हार्डवेअर, दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम, तिसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक, पुण्यात कोणत्या दिवशी कोणतं दुकान उघडणार?

Corona Update : महाराष्ट्राला दिलासा, दोन दिवसात 700 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 44 पैकी 34 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

Jalgaon Corona Updates News

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.