Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील 6 ते 7 मित्र भुकेल्या नागरिकांना अन्नदान करण्यासाठी गेले होते, त्यांच्या रिक्षाला परत येताना अपघात झाला (Jalgaon Lockdown Rickshaw Accident)

Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 09, 2020 | 9:32 AM

जळगाव : कोरोनामुळे जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाने आघात केला. रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात जळगावात दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Jalgaon Lockdown Rickshaw Accident) 20 वर्षीय ऋषिकेश उमेश शेटे आणि 18 वर्षीय विशाल दिनेश पाटकरी या दोघांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. अमळनेर शहरातील वडचौक येथील रहिवासी होते.

‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांना आनंदर करा, असं आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच करत आहेत. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ परिसरात गोरगरीब, भुकेल्या नागरिकांना अन्नदान करण्यासाठी जळगावातील 6 ते 7 मित्र गेले होते.

हेही वाचा : जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना रुग्ण नाही!

अन्न वाटप केल्यानंतर घरी परतत असणाऱ्या मित्रांवर नियतीने क्रूर घाला घातला. झाडी गाव ओलांडल्यावर त्यांची रिक्षा उलटली. या अपघातात ऋषिकेश आणि विशाल यांना जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना काल रात्री 8 वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गलवाडे गावाजवळ घडली. तरुण मुलांचा  अचानक मृत्यू झाल्याने शेटे आणि पाटकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाहा सकाळच्या हेडलाईन्स :

(Jalgaon Lockdown Rickshaw Accident)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.