विजयादशमीसाठी ‘सुवर्णनगरी’ सज्ज, पण सोनं खरेदीला ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद

विजयादशमीला सुवर्णनगरी जळगावातील सराफा बाजार सज्ज आहे. पण नागरिकांनी आज सोनं खरेदीला अत्यल्प प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावात आज सोन्याचा भाव ५१ हजार ६०० अधिक जीएसटी असा आहे. सराफा बाजारात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध आकर्षक योजना देण्यात आल्या आहेत.

विजयादशमीसाठी 'सुवर्णनगरी' सज्ज, पण सोनं खरेदीला ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद
मागच्या सत्रात सोन्यामध्ये 0.5 टक्क्यांनी घसरण झाली आहे चांदीने 1.6 टक्क्यांनी उडी घेतली आहे.
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 1:12 PM

जळगाव: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीला सुवर्णनगरी जळगावातील सराफा बाजार सज्ज आहे. पण नागरिकांनी आज सोनं खरेदीला अल्प प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. पण कोरोना आणि सोन्याचे वाढलेले भाव यामुळं नागरिकांनी सोनं खरेदीला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळं गेली सात महिने सराफा बाजार बंद होता. सरकारनं दुकानं उघडण्यास परवानगी दिल्यानंतर दसरा हा पहिलाच मोठा सण आला आहे. त्यामुळं सराफा व्यावसायीकांनीही ग्राहकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. (Jalgaon gold rate and low response of customer)

गेल्या काही महिन्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तरीही सणवार आणि लग्नसराईत लोकांचा कल सोनं खरेदीकडे राहिला आहे. पण आज सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. जळगावात आज सोन्याचा भाव ५१ हजार ६०० अधिक जीएसटी असा आहे. सराफा बाजारात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध आकर्षक योजना देण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफा व्यावसायिकांनी आपट्याची पानंही बनवली आहेत. ही पानं अर्धा ते दोन ग्राम वजनात उपलब्ध आहेत.

सराफा व्यावसायिकांना दिवाळीची आशा

कोरोना आणि लॉकडाऊनमुळं संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला होता. सरकारनं अनलॉक केल्यानंतर पहिलाच मोठा सण आला आहे. या सणावर थोडाफार कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. पण दिवाळीपर्यंत सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा जळगावमधील सराफा व्यावसायिक सिद्धार्थ बाफना यांनी व्यक्त केली आहे.

दिवाळीपर्यंत सोनं 65 हजारावर जाणार?

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल याबाबत म्हणाले की, दिवाळीपर्यंत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल 65 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, तर चांदीचा दर प्रति किलो 70-75 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

संबंधित बातम्या: 

Gold Rate: सोनं महागलं, ऐन सणासुदीत चांदीही वधारली; पाहा आजचे दर

दिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार

Jalgaon gold rate and low response of customer

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.