Jalgaon Gold Rate | ‘सुवर्णनगरी’ जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 50 हजार रुपये प्रतितोळा

गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याचे भाव वाढतच आहेत. सोन्याच्या दरात गेल्या 12 दिवसात सुमारे 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. (Jalgaon Gold Rate Jumps to 50 thousand)

Jalgaon Gold Rate | 'सुवर्णनगरी' जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 50 हजार रुपये प्रतितोळा
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.
Follow us
| Updated on: Jun 26, 2020 | 9:45 AM

जळगाव : यंदा लग्नसराईचा मौसम ‘कोरोना’मुळे काहीसा झाकोळला गेला. दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेपासून सोने खरेदीचा उत्साहही कमी झाला. परंतु दैनंदिन व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असताना सोने ‘भाव’ खाऊ लागले आहे. भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुवर्ण नगरी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे भाव काल (25 जून) प्रतितोळ्याला 50 हजार रुपयांवर जाऊन पोहचले. (Jalgaon Gold Rate Jumps to 50 thousand)

सोन्याला मिळालेला हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव मानला जात आहे. पुढील काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरात आणखी दरवाढ होईल, असा अंदाज सराफ व्यावसायिकांना आहे.

सोने-चांदीच्या दरात आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे दर यांचा मोठा परिणाम होत असतो. सध्या भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने सोने-चांदीचे भाव वधारत आहेत. त्यात कोरोनामुळे परदेशातून होणारी आवकही कमी असल्याने अधिक परिणाम जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनचा उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम, पुण्यात 30 टक्के उद्योगांना कामगारांचा तुटवडा

सोन्याच्या दरात गेल्या 12 दिवसात सुमारे 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याचे भाव वाढतच आहेत. 9 जून रोजी 46,800 रुपयांवर असलेले सोने 11 जून रोजी 47,200, तर 15 जून रोजी 47,800 रुपयावर पोहचले.

17 जून रोजी सोन्याने 48 हजार रुपयांचा टप्पा गाठला. मात्र, भारत-चीन सीमेवर तणाव वाढतच असल्याने त्याचा परिणाम होऊन 20 जून रोजी सोन्याच्या भावात थेट 700 रुपयांनी वाढ झाली आणि ते 48 हजार 700 रुपयांवर पोहचले.

सोन्याचे भाव 25 जूनला चक्क 50 हजार रुपयांवर गेले. सोन्याच्या भावातील आतापर्यंतचा हा नवा उच्चांक असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. तसे पाहता लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद असताना कमॉडिटी बाजारात सोने 50 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, प्रत्यक्ष सुवर्ण बाजारातील ही नवी उच्चांकी मानली जात आहे.

(Jalgaon Gold Rate Jumps to 50 thousand)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.