जळगावाचा कोरोना मृत्यूदर देशाच्या चौपट, देशाचा मृत्यूदर 2.87, तर जळगावचा 11.49 टक्के
देशाच्या तुलनेत जळगावचा मृत्यूदर हा चौपट आहे. जळगावातील मृत्यूदर हा कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण (Jalgaon Corona Death rate Highest) झालं आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली (Jalgaon Corona Death rate Highest) आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जळगावात 635 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या दोन महिन्यात 73 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशात कोरोना बळींचा मृत्यूदर 2.87 टक्के आहे. तर जळगावात कोरोना बळींचा मृत्यूदर हा सर्वाधिक 11.49 टक्के आहे. देशाच्या तुलनेत जळगावचा मृत्यूदर हा चौपट आहे. जळगावातील मृत्यूदर हा कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात 28 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 2 एप्रिल रोजी कोरोनाचा (Jalgaon Corona Death rate Highest) पहिला बळी गेला होता. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते मे अखेरपर्यंत म्हणजेच दोनच महिन्याच्या काळात जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत गेली. या काळात तब्बल 73 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगावातील भुसावळमध्ये सर्वाधिक 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्या खालोखाल अमळनेर 13 आणि जळगाव 11 जणांचे मृत्यू झाला आहे. रावेरमध्येही 11 कोरोनाबाधितांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर 11.49 टक्के असला तरी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल आणि मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी जिल्ह्यातील तपासणीचा आकडा कमी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना वाढवण्यावर प्रशासन भर देत आहे. जिल्हा रुग्णालयात आधी 10 अतिदक्षता बेड्स होते. त्यात पुन्हा 20 बेड्स वाढवण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनासाठी अधिग्रहीत केलेल्या एका खासगी रुग्णालयात 10 अतिदक्षता बेड्स उभारण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील महापालिका तसेच सर्वच नगरपालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये नागरिकांचे स्क्रिनिंग केले जात आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांना तत्काळ क्वारंटाईन केले जात आहे. कोरोनासाठी जिल्ह्यात त्रिस्तरीय रचनेत उपाययोजना करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी (Jalgaon Corona Death rate Highest) सांगितले.
संबंधित बातम्या :
जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा