VIDEO: बोट लावू नका, केवळ दाखवा, गुदगुल्यांनी हा माणूस लोळतो!
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथे एक अफलातून माणूस आहे. सुनील सानप असं त्यांचे नाव. आपल्या सर्वांना गुदगुल्या होतात, तसंच सुनील सानप यांनाही गुदगुल्या होतात. मात्र तुम्हा-आम्हापेक्षा सानप यांना होणाऱ्या गुदगुल्या, या कमालीच्या आहेत. बोट लावीन तिथे गुदगुल्या म्हणतात, पण, सानप यांना नुसतं बोट दाखवलं तरी गुदगुल्या होतात. त्यांच्या शरीराला स्पर्श जरी केला तरी ते अक्षरश: […]
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथे एक अफलातून माणूस आहे. सुनील सानप असं त्यांचे नाव. आपल्या सर्वांना गुदगुल्या होतात, तसंच सुनील सानप यांनाही गुदगुल्या होतात. मात्र तुम्हा-आम्हापेक्षा सानप यांना होणाऱ्या गुदगुल्या, या कमालीच्या आहेत. बोट लावीन तिथे गुदगुल्या म्हणतात, पण, सानप यांना नुसतं बोट दाखवलं तरी गुदगुल्या होतात. त्यांच्या शरीराला स्पर्श जरी केला तरी ते अक्षरश: गडागडा लोळू लागतात.
सुनील सानप हा गावातील रंजक माणूस. ते शेतकरी आहेत. गावातील चौकाचौकात लोक त्यांची वाट पाहात असतात. सुनील सानप आले की लगेचच जमलेलं टोळकं त्यांची मजा घेण्यासाठी गुदगुल्या करण्यासाठी धावू लागतात. सुनील सानप यांना स्पर्श करा किंवा नका करु मात्र गुदगुल्या होणार या मानसिकतेनेच ते लोळू लागतात.
घरातून स्वछ कपडे घालून निघालेले सुनील घरी परततात ते मळके कपडे घेऊन. मित्रांनी हात नुसता वर जरी केला, तरी सुनील पळत सुटतात. पोटाला हात लावला तर मग काही विचारायलाच नको. सुनील लोटपोट होऊन हसत राहतात. त्यांचा मूड चांगला असो वा वाईट त्यांना कुणी गुदगुल्या केल्या, तरी दुसऱ्याला होणाऱ्या आनंदात आपला आनंद पाहतात.
सुनील यांना याबाबत विचारलं असता, ते म्हणतात “लहानपणापासूनच मला खूप गुदगुल्या होतात. मी कुस्ती खेळत होतो, तेव्हापासून गुदगुल्यांबाबत जाणीव झाली. माझी सध्या मानसिकता झाली आहे. कुणी हात जरी वर केला, तरी मला गुदगुल्या होतात. याबाबत डॉक्टरांशी कधीच बोललो नाही. घरी सर्वांना माहित आहे. अनेक जण मस्करीत मला गुदगुल्या करत राहतात, मात्र मी त्यांच्यावर चिडत नाही”