आईने घरी जायला सांगितले, मात्र ते घरी परतलेच नाही, जालन्यात शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातल्या धनगरप्रिंप्री गावात ही हृदयद्रावक घटान घडली.
जालना : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे (Jalna Brothers Drowned). जालना जिल्ह्यातल्या धनगरप्रिंप्री गावात ही हृदयद्रावक घटान घडली आहे. वैष्णव ज्ञानेश्वर बहुले आणि गौरव ज्ञानेश्वर बहुले अशी या चिमुकल्यांची नावं आहेत. ते सातव्या आणि चौथ्या वर्गात शिक्षण घेत होते (Jalna Brothers Drowned).
हे दोघेही भाऊ आईसोबत शेतात गेले होते. सायंकाळच्या सुमारास आईने त्यांना घरी जायला सांगितले. तेव्हा दोघेही घरी जाण्यासाठी निघाले. मात्र दोघेही घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरु झाला. शेततळ्याच्या गेटवर एकाची चप्पल आढळून आली. तेव्हा शेततळ्यात शोध घेतला असता दोन्ही मुलं शेततळ्यात आढळून आली.
त्यांना तात्काळ शेततळ्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केलं. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पायात पँट अडकून घात, नातवाला पोहायला शिकवताना आजोबांचा बुडून मृत्यूhttps://t.co/XlpJTafM0Z
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
Jalna Brothers Drowned
संबंधित बातम्या :
रात्री अंधारात मासे पकडण्यासाठी नदीवर, काका-पुतण्याचा बुडून मृत्यू
माहेरुन सासरी जाताना कालव्यात घसरुन पडली, कोल्हापुरात नवविवाहितेचा मृत्यू