घराचे दरवाजे बंद केले, मग पत्नीचा गळा आवळला, वेडाच्या भरात हत्येचा संशय
वेडाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना जालन्यातील अंबड तालुक्यात घडली (Jalna husband killed Wife) आहे.
जालना : वेडाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना जालन्यातील अंबड तालुक्यात घडली आहे. मंगलबाई बापासाहेब (35) असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या मृत्यू प्रकरणी अंबड पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. (Jalna husband killed Wife)
नेमकं प्रकरण काय?
बाप्पासाहेब उर्फ सचिन टकले आणि त्याची पत्नी मंगलबाई टकले हे दोघे अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील बाजार गल्लीत राहत होते. बाप्पासाहेब टकले हा दोन महिन्यांपासून वेड्यासारखा वागत होता. रविवारी 26 जुलैला दुपारी 4 च्या सुमारास त्याने घराचे दरवाजे बंद केले. त्यानंतर पत्नीची गळा दाबून खून केला.
यानंतर पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. टकले दाम्पत्याचा घराचा दरवाजा ठोठावल्यानंतर ते दोघेच त्या ठिकाणी होते. त्यानंतर एकंदर घटनास्थळाची परिस्थिती, मृत व्यक्तीचा पंचनामा, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले मृत दाखला, साक्षीदारांचा जबाब यावरी पतीनेच तिचा खून केल्याचं समोर आलं आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
याप्रकरणी अंबडचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी फोजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून बारकाईने तपास केला. रोहिलागड येथील विवाहिता मंगलबाई मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची अंबड पोलिसांनी नोंद केली होती.
मात्र त्यानंतर आता आरोपी पती बप्पासाहेब टकले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (Jalna husband killed Wife)
संबंधित बातम्या :
रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, अवघ्या 12 तासात आरोपीला अटक
विवाहबाह्य संबंधाचा संशय, नागपुरात पत्नी आणि तिच्या मित्राची हत्या