हैद्राबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची शनिवारी (21 डिसेंबर) हैद्राबादमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती (AIMIM Rally Hyderabad). या रॅलीमध्ये दिल्ली पोलिसांना भिडणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या पोस्टर गर्ल्स लदीदा सखलून आणि आयशा रेन्ना यांनीही सहभाग घेतला (Jamia Girls in Owaisi Rally).
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विरोध प्रदर्शनादरम्यान लदीदा सखलून आणि आयशा रेन्ना या दोन मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये या दोन्ही मुली पोलिसांना आव्हान देत होत्या.
लदीदा सखलून आणि आयशा रेन्ना या केरळच्या राहणाऱ्या आहेत. लदीदा केरळच्या कन्नूर, तर आयशा मणप्पूरम जिल्ह्यातील कोनडोट्टी गावात राहते. जामिया आंदोलनादरम्यान या दोन्ही मुलींचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये या दोघी एका तरुणाला पोलिसांच्या मारहाणीपासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अचानक या दोघी चर्चेत आल्या.
असदुद्दीन ओवैसी यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक राज्यातील मुस्लीम विद्यार्थी पोहोचले होते. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आयोजित या रॅलीला लदीदा आणि आयशानेही संबोधित केलं.