आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार!, पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मीमधील कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिक आता जमीन खरेदी करु शकणार आहेत. ही जमीन उद्योग-व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे. मात्र, अन्य राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येणार नाही.

आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार!, पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 3:45 PM

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्याबाहेरील व्यक्तीही जमीन खरेदी करु शकणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. असं असलं तरी जम्मू-काश्मीरमधील शेतजमीन मात्र कुणीही विकत घेऊ शकणार नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीर पुनर्गठन अधिनियम अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या अधिनियमानुसार आता जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिकांना कारखाना, घर किंवा दुकानासाठी जमीन खरेदी करता येणार आहे. (Now in Jammu-Kashmir land can be purchased by peoples of other state)

जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरचे उद्योग, व्यवसाय यावेत, तिथे रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देश्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलं आहे. उद्योग, व्यवसायांसाठी जमीन घेता येणार असली तरी शेतजमीन मात्र जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनाच घेता येणार आहे. मोदी सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी अन्य राज्यातील नागरिकाला जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येत नव्हती. मात्र, आता अन्य राज्यातील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करुन तिथे आपल्या उद्योग-व्यवसाय सुरु करु शकणार आहेत. (Now in Jammu-Kashmir land can be purchased by peoples of other state)

जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारचे मोठे निर्णय

पंतप्रधान मोदी यांनी धाडसी निर्णय घेत मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता केंद्र सरकारनं जमीन खरेदीबाबत हा मोठा निर्णय घेतला आहे.

मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यानंतर वादंग

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी संवैधानिक बदल वापस घेतले जात नाहीत. तोपर्यंत भारतीय राष्ट्रध्वज उचलण्यात कुठलही स्वारस्य नाही असं वक्तव्य शुक्रवारी केलं होतं. तसेच निवडणूक लढण्यातही रस नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. तसेच त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय.

संबंधित बातम्या:

‘देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही’, मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी

Now in Jammu-Kashmir land can be purchased by peoples of other state

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.