Pakistan spy drone | पाकिस्तानचा स्पाय ड्रोन पाडला, मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय सीमसुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानचा ड्रोन पाडला. बीएसएफने कठुआ बॉर्डरवर पाकचा ड्रोन टिपून उद्ध्वस्त केला. (Pakistani spy drone shot down)
श्रीनगर : एकीकडे चीनसोबत संघर्ष सुरु असताना तिकडे पाकिस्तानच्याही कुरापती कायम आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने भारतीय सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारतीय जवान त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आहेत. भारतीय सीमसुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानचा ड्रोन पाडला. बीएसएफने कठुआ बॉर्डरवर पाकचा ड्रोन टिपून उद्ध्वस्त केला. (Pakistani spy drone shot down)
धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या दिशेने आलेल्या या ड्रोनसोबत काही हत्यारेही बांधली होती. या ड्रोनसोबत M-4 ही अमेरिकी बनावटीची रायफल, दोन मॅगजीन आणि 60 गोळ्या, सात ग्रेनेड असा तगडा साठा होता. हा शस्त्रसाठा अली भाई नावाच्या तरुणाच्या नावे आला होता. हे ड्रोन 8 फूट उंचीचं होतं.
Looking at the kind of weapons that have been recovered, it seems whoever is responsible for this was trying to create a major incident. There is no doubt the drone came from Pakistan: NS Jamwal, Inspector General, Border Security Force (Jammu Frontier) https://t.co/GP0wTMvGCU pic.twitter.com/rSlwJ4WnBq
— ANI (@ANI) June 20, 2020
कठुआ सेक्टरमध्ये पनेसर पोस्टजवळ पाकिस्तानी बाजूने हे ड्रोन कंट्रोल केलं जात होतं. त्याआधी एका चकमकीत जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याकडे अशाचप्रकारची हत्यारे सापडली होती.
पाकिस्तानी दहशतवाद्यांना हत्यारे पुरवून जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा पाकचा डाव नेहमीचाच आहे. मात्र त्याला भारतीय जवान चोख उत्तर देत आहेत. पाकिस्तानकडून सीमाभागातील कुपवाडा, राजौरी आणि जम्मूमध्ये सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.
पाकिस्तानी सेनेकडून LOC वर शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील पूंछ परिसरातही गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय जवानांनीही उत्तर दिलं.
(Pakistani spy drone shot down)
संबंधित बातम्या
इकडे मोदींची सर्वपक्षीय बैठक, तिकडे हवाई दलप्रमुख लेहमध्ये दाखल, मिराज आणि सुखोई विमानं सज्ज