काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं परदेशात सेटल
अनेक काश्मीरी तरुणांना हिंसाचारामध्ये ओढून त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं. कारण एकच - स्वतंत्र काश्मीर. पण स्वतंत्र काश्मीर मागणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं मात्र परदेशात सेटल आहेत.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील हिंसाचार जगाने पाहिलाय. काश्मीरमधील मुलं ना व्यवस्थित शिक्षण घेऊ शकतात, ना त्यांना नोकरी करता येते. अनेक काश्मीरी तरुणांना हिंसाचारामध्ये ओढून त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं. कारण एकच – स्वतंत्र काश्मीर. पण स्वतंत्र काश्मीर मागणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं मात्र परदेशात सेटल आहेत. काश्मीरमधील अनेक मोठे नेते असणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं परदेशात शिक्षण घेऊन तिथेच नोकरी करत आहेत.
फुटीरतावादी आणि त्यांच्या मुलांची यादी
निसार हुसेन (वहीदत ए इस्लामी) – मुलगा आणि मुलगी ईराणमध्ये राहतात, तिथेच नोकरी करतात.
बिलाल लोन – सर्वात छोटी मुलगी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेते.
अशरफ सहरई (चेअरमन, तहरिक-ए-हुर्रियत) – खालिद आणि आबिद ही दोन्ही मुलं सौदी अरेबियात काम करतात.
जीएम. भट्ट (आमिर ए जमात) – मुलगा सौदी अरेबियात डॉक्टर
आसिया अंद्राबी (दुख्तरान-ए-मिल्लत) – एक मुलगा मलेशियात शिक्षण घेतोय, तर दुसरा मुलगाही ऑस्ट्रेलियात शिकत आहे.
मोहम्मद शफी रेशी (DPM) – मुलगा अमेरिकेत पीएचडी करत आहे.
अशरफ लाया (तहरिक ए हुर्रियत) – मुलगी पाकिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
जहूर गिलानी (तहरिक ए हुर्रियत) – मुलगा सौदी अरेबियात विमान कंपनीत काम करतो.
मीरवाईज उमर फारुख (हुर्रियत चेअरमन) – बहीण अमेरिकेत राहते.
मोहम्मद युसूफ मीर (मुस्लीम लीग) – मुलगी पाकिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेते.
स्वतंत्र काश्मीरच्या नावावर घाटीमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची ही यादी आहे. काश्मीरच्या तरुणांना भारताविरुद्ध भडकवण्याचं काम या नेत्यांकडून केलं जातं. पण त्यांची मुलं मात्र परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. तर दुसरीकडे काश्मीरच्या हजारो तरुणांना चुकीच्या मार्गाला लावण्याचं काम या नेत्यांनी केलंय.
दरम्यान, सध्या यापैकी अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. तर अनेक नत्यांची सरकारी सुरक्षा आणि सुविधाही केंद्र सरकारने परत घेतल्या आहेत. सर्व फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढली असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच संसदेत सांगितलं होतं.