Janta Curfew LIVE : सायंकाळी 5 नंतरही कर्फ्यू सुरु राहणार : राजेश टोपे

| Updated on: Mar 22, 2020 | 6:08 PM

देशात सकाळी 7 ते रात्री 9 जनता कर्फ्यू, त्याबाबतची प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड फक्त एका क्लिकवर

Janta Curfew LIVE : सायंकाळी 5 नंतरही कर्फ्यू सुरु राहणार : राजेश टोपे
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार पाहता (Janta Curfew) देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना आत एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं (Janta Curfew) आणि कार्यालयांना टाळं असणार आहे. तसेच, कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलं आहे.

LIVE UPDATES :

[svt-event title=”देशभरात घंटा, ताटं, टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त” date=”22/03/2020,5:24PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”22/03/2020,4:23PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रात कलम 144 लागू, मुख्यमंत्र्यांची घोषणा, अत्यावश्यक सुविधा सोडून इतर सर्व बंद ठेवण्याचे आदेश, लोकल आणि रेल्वेही रद्द [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,12:55PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : जनता कर्फ्यू आणि कार्यालयांमधल्या बंदीमुळे वीजेच्या मागणीत प्रचंड घट, रविवारी 11 वाजता महाराष्ट्राची वीजेची मागणी रोजच्या 21200 मेगावॅटच्या तुलनेत 15182 मेगावॅट, मुंबईची मागणी रोजच्या 3100 मेगावॅटच्या तुलनेत 1611 मेगावॅटपर्यंत घसरली, कार्यालयं बंद असल्यानं वीजेच्या मागणीत मोठी घट [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”22/03/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ] शिरोळ : जनता कर्फ्यूमुळे राजू शेटटी दिवसभर शिवारातच, राजू शेट्टी यांनी दिवसभर शिवारात शेतीची कामे करत जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला, सकाळपासूनच शिरोळमधील त्यांच्या शिवारातील उस, कडवाळ, शाळू या पिकांना पाणी देत होते [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ] नवीमुंबई : पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नवी मुंबईकरांचा शंभर टक्के प्रतिसाद, पूर्ण परिसरात सर्वत्र शांतता, वाशीतील छत्रपती शिवाजी चौक रोड निर्मनुष्य

[svt-event date=”22/03/2020,12:15PM” class=”svt-cd-green” ] पालघर : पालघरच्या ग्रामीण भागातील जनतेचा जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद, एरवी संपूर्ण बाजारपेठा, रस्ते गर्दीने फुललेले असतात, मात्र आज ग्रामीण भागातील रस्ते ओस, नागरिक घराबाहेर पडलेले नाहीत, त्यामुळे रोजच्या गर्दीच्या ठिकाणांवर शुकशुकाट [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : इचलकरंजी शहरामध्ये जनता कर्फ्यूमध्ये शहर कडकडीत बंद, शहरांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, इचलकरंजी शहरातील सर्वच व्यापारी, जनतेचा कर्फ्यूला पाठिंबा, शहरांमध्ये कडकडीत बंद, शहरातील मेन रोड चौक, गांधी पुतळा, जनता मेक चौक, शाहू पुतळा चौक, डेक्कन चौक, नदी वेस नाका, सांगली नाका, संपूर्ण रस्ते ओस [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ] मनमाड : मनमाड शहरासह रेल्वे स्टेशनवर जनता कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद, शहरातील प्रमुख बाजारपेठासह सर्व दुकानं बंद, शहरात शुकशुकाट, स्टेशनवरील सर्व कँटिनही बंद, नेहमी प्रवाश्यांच्या गर्दीने गजबजलेल्या स्टेशनवरही शुकशुकाट [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : जनता कर्फ्यूला लासलगावकरांचा शंभर टक्के प्रतिसाद, लासलगाव बाजार समितीतील कांदा, धान्य आणि जनावरे लिलाव तसेच दुकानं, आठवडे बाजारही बंद, बंदमुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प, रस्त्यावर शुकशुकाट [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ बंद, हॉटेल्स दुकाने आणि पळ मार्केट कडकडीत बंद, छोट्या व्यवसायिकांसह सर्वांनीच पळाला जनता कर्फ्यू [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,11:58AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं, त्याला मुंबईत उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे, मुंबईच्या भायखळा परिसरात शुकशुकाट [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,11:55AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उल्हासनगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उल्हासनगरमध्ये सर्वत्र स्मशान शांतता, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कल्याण-बदलापूर रोडवरील गजबजलेला असणारा शिवाजी चौकात निर्मनुष्य  [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,8:23AM” class=”svt-cd-green” ] देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही नागरिकांना जनता कर्फ्यू दरम्यान घरात राहण्याचं आवाहन केलं आहे.

[svt-event date=”22/03/2020,8:10AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : जनता कर्फ्यूला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद, नवी मुंबईतील सर्व रस्ते शून्य, सगळे व्यवहार सुद्धा ठप्प, शहरातील मुख्य रस्ते शुकशुकाट दुधापासून ते पेट्रोल पंपापर्यत सर्व बंद

[svt-event date=”22/03/2020,8:09AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादकरांचा जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद, रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट, रिक्षा, बससह खाजगी वाहनेही पूर्णपणे बंद, वर्दळीच्या रेल्वे स्थानकावरही कमालीचा शुकशुकाट, औरंगाबाद शहरातील सर्व व्यवहार ठप्प

[svt-event date=”22/03/2020,7:54AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यात जनता कर्फ्यूचं समर्थन, कोरोनाला लढा देण्यासाठी जनता सज्ज [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,7:53AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : भाजीविक्रेत्यांचा जनता कर्फ्यूला पाठिंबा, दादर मार्केटमध्ये शुकशुकाट [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,7:17AM” class=”svt-cd-green” ] भाईंदरमध्ये कोरोना विषाणूला हरवण्यासाठी जनता कर्फ्यूला पाठिंबा, सकाळी मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर शुकशुकाट [/svt-event]

[svt-event date=”22/03/2020,7:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”22/03/2020,7:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”22/03/2020,7:01AM” class=”svt-cd-green” ] घरातून बाहेर पडू नका, सुरक्षित राहा, अभिनेता रितेश देशमुखचं नागरिकांना आवाहन

[svt-event date=”22/03/2020,6:37AM” class=”svt-cd-green” ] जनता कर्फ्यूचं काऊंटडाऊन सुरु, काहीच वेळात सात वाजेपासून देशात जनता कर्फ्यू लागू [/svt-event]

जनता कर्फ्यू दरम्यान ‘या’ लोकांना बाहेर पडण्यास परवानगी

जनता कर्फ्यूदरम्यान कोणत्याही नागरिकाला घरातून बाहेर पडता येणार नाही. सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान कोणताही नागरिक सोसायटी किंवा पार्कमध्ये फिरु शकणार नाही. मात्र जर कोणतीही अत्यावश्यक परिस्थिती उद्भवली तर तुम्ही घराबाहेर पडू शकता. यादरम्यान कोणत्याही रुग्णालयात जाणाऱ्या व्यक्तीला थांबवण्यात येणार नाही.

जनता कर्फ्यूदरम्यान पोलीस, मीडिया, डॉक्टर, साफ-सफाई कर्मचारी या लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. या व्यक्तींना पंतप्रधान मोदींनी घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे.

मुंबईत काय सुरु राहणार?

सरकारी आणि खासगी रुग्णालय
औषधं दुकाने
किराणा दुकाने
दूध डेअरी
सरकारी कार्यालय (फक्त 25 टक्के कर्मचारी )
रेल्वे, बेस्ट बस

मुंबईत ‘या’ सुविधा बंद?

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट बंद
मोठे मॉल बंद
जिम , जलतरण तलाव
सिनेमागृह
मुंबई पुणे ट्रॅव्हल बंद
खासगी कम्पन्या बंद
शाळा कॉलेज
मोठ्या चौपट्या बंद
उद्यान बंद
लग्नाचे हॉल काही प्रमाणात बंद
मच्छीमार्केट बंद
मुंबईतील छोटी मोठी मंदिरे बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (19 मार्च) रात्री आठ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आज संपूर्ण देशभरात (Janta Curfew Live) जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे.