पुणे : लॉकडाऊनचा पाचवा टप्पा जाहीर झाला (Janta Vasahat Corona Cases). मात्र, अशा परिस्थितीतही पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी झालेला दिसत नाही. पुण्यातील जनता वसाहतीच्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा विळखा वाढला आहे. जनता वसाहतीत गेल्या तीन दिवसात तब्बल 22 रुग्ण (Janta Vasahat Corona Cases) वाढले आहेत.
जनता वसाहतीत 27 तारखे पासून तीन दिवसात 22 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर दोन दिवसात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जनता वसाहतीत सध्या कोरोनारुग्णांची संख्या 73 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जनता वसाहतीत आतापर्यंत 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 46 बाधित रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे (Janta Vasahat Corona Cases).
पानमळा, दांडेकर पूल झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
जनता वसाहतीनंतर या परिसरातील पानमळा आणि दांडेकर पूल झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या दोन्ही ठिकाणी रविवारी 16 नव्या कोरोनारुग्णांची वाढ झाली. तर शनिवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
सिंहगड परिसरात 210 कोरोनारुग्ण
सिंहगड परिसरात आतापर्यंत तब्बल 210 कोरोनाबाधित रुग्ण असून 7 जणांचा कोरोनाबळी गेला आहे. मात्र, रविवारी या परिसरातील स्वॅब तपासणी थांबवण्यात आली आहे.
Pune Corona | पुणे विभागात आतापर्यंत 4,799 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 9 हजारांच्या पारhttps://t.co/uwYaWY0bM4@PMCPune @InfoDivPune #punelockdown #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 30, 2020
जनता वसाहत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
जनता वसाहतीत कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानं हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या परिसरातील काही गल्ल्या सील करण्यात आल्या असून तपासणी सुरु आहे. या परिसरात 15 ते 20 हजार कुटुंब असून साधारण 60 ते 65 हजार लोकसंख्या आहे (Janta Vasahat Corona Cases).
संबंधित बातम्या :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
पुणे विभागात किराणा दुकानात सॅनिटायझर विक्रीला बंदी
पुणे शहर ‘स्लम फ्री सिटी’ होणार, महापालिका झोपडपट्ट्या पाडून टुमदार घरं उभारणार