शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, दहशतवादी हल्ल्यात चाळीसगावच्या सुपूत्राला वीरमरण

दहशतवादी हल्ल्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आलं. (Jawan Yash Deshmukh Died Last rituals At Pimpalgaon) 

शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, दहशतवादी हल्ल्यात चाळीसगावच्या सुपूत्राला वीरमरण
यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 1:09 PM

जळगाव : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आलं. शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव मूळ गावी दाखल झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Jawan Yash Deshmukh Died Last rituals At Pimpalgaon)

शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे दाखल झाले. त्यासाठी खास हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीतून त्यांचे पार्थिव नाशिक येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आठ वाजता पिंपळगाव येथे दाखल झाले.

शहीद जवान यश देशमुख यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थही पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या वीर मुलाची वाट पाहत आहेत. कडाक्याच्या थंडीत देखील अनेक लोक रात्रभर जागी होती. हुतात्मावीर यश देशमुख यांच्या पार्थिवाला अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी असंख्य नागरिक जमा झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 22 वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख यांना वीरमरण आले.

यश देशमुख हे 11 महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रूजू झाले होते. यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते.

यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Jawan Yash Deshmukh Died Last rituals At Pimpalgaon)

संबंधित बातम्या :  

‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’, शहीद जवानाचा अखेरचा संवाद वाचून डोळे पाणावतील

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.