दीड वर्ष, 72 कलाकारांच्या मदतीने जेजुरी रेल्वे स्थानकावर मल्हारगडाची प्रतिकृती
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीतील रेल्वे स्थानकाने एक आगळंवेगळं रुप धारण केलं आहे. रेल्वे स्थानकाचं पूर्वीचं प्रवेशद्वार बदलून त्या ठिकाणी खंडेरायाच्या मंदिराची प्रतिकृती (Jejuri fort replication on railway station) उभारण्यात आली आहे.
पुणे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीतील रेल्वे स्थानकाने एक आगळंवेगळं रुप धारण केलं आहे. रेल्वे स्थानकाचं पूर्वीचं प्रवेशद्वार बदलून त्या ठिकाणी खंडेरायाच्या मंदिराची प्रतिकृती (Jejuri fort replication on railway station) उभारण्यात आली आहे. त्यामुळे जेजुरीत येणाऱ्या प्रवाशी आणि भाविकांना जेजुरीच्या मंदिरात आल्याचा आनंद मिळू लागला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून हे नूतनीकरणाचं काम करण्यात (Jejuri fort replication on railway station) आलं आहे.
जेजुरी हे राज्यासह परराज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाचं मंदिर असलेलं शहर आहे. जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक इथं येत असतात. गेल्या वर्षी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून जेजुरीतील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध केला होता. त्यानुसार या रेल्वे स्थानकाचं प्रवेशद्वार खंडोबा मंदिराच्या प्रतिकृतीत उभारण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जेजुरीच्या धर्तीवर बारामती रेल्वे स्थानकातही आगळ्यावेगळ्या पद्धतीचं प्रवेशद्वार उभारलं जाणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
“जेजुरी रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण करण्याची मागणी होती. त्यानुसार कामे करतानाच मल्हार गडाची प्रतिकृती उभारून आगळेवेगळे स्वरूप जेजुरी रेल्वे स्थानकाला देण्यात आलं आहे. तब्बल दिड वर्ष हे काम सुरु होतं, तर 72 कलाकार यासाठी काम करत होते”, असं शिल्पकार दिनकर थोपटे यांनी सांगितलं.
जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा कायापालट खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे झाला. तसेच काम सुरु करतानाच खंडोबा मंदिराची प्रतिकृती उभी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आल्याचं समन्वयक मेहबूब पानसरे यांनी सांगितले.
जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथं येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असतातच. मात्र रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मल्हार गडाची प्रतिकृती पाहून भाविकांना आणखी समाधान मिळावं या उद्देशानं हे आगळंवेगळं प्रवेशद्वार तयार करण्यात आलं आहे. हे प्रवेशद्वार भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.