‘आम्ही कुठे म्हणालो की तुम्ही खुनाचे आरोपी, खूनाचे आरोपी हे…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणात २२ दिवस सर्व यंत्रणेला कामाला लावून वाल्मिक कराड स्वत:हूनच पुणे सीआयडी कार्यालयात हजर झाले. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

'आम्ही कुठे म्हणालो की तुम्ही खुनाचे आरोपी, खूनाचे आरोपी हे...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
jitendra awhad and dhananjay munde
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 7:19 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे निर्घृण खून झाल्यानंतर २२ दिवसांनंतर वाल्मिक कराड हे स्वत: हून पोलिसांना शरण आले आहेत. यानंतर या प्रकरणात तपास निष्पक्षपातीपणे व्हावा म्हणून राष्ट्रवादीचे आमदार संजय सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आपला या प्रकरणात काही संबंध नसल्याने आपण राजीनामा देणार नाही असे मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे.

मंत्री मुंडे यांचे नाव न घेता जितेंद्र आव्हाड म्हणाले की ते अतिशय समाधानी आहेत. समाधानी असल्याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बसले नसते. प्रश्न हा नैतिकतेचा आहे,अर्थात त्याची अपेक्षा आपण कोणाकडून करतो याचं आपल्याला भान असायला हवं, ठीक आहे. ज्या पद्धतीने आरोपीचे व्हिडीओ येत आहेत. याच्यातून काय होईल असं आम्हाला वाटत नाही. महाराष्ट्राची जनता सर्व बघते आहे. ते गुन्हेगार आहेत किंवा त्यांनी खून केला आहे, त्यामुळे आम्ही राजीनामा मागत नाही…. तर खून कोणी केला आणि त्याच्या मागे कोण आहे हे शोधायचं असेल तर त्यांचा राजीनामा हवा आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की जिथे चौकशी सुरू असेल तिथे हे जाऊ शकत नाही का? ते जाऊ शकतात फिरत फिरत गेले. ते तिकडे गेल्यानंतर पोलिसांना उभे राहावे लागेल. सगळीच क्रोनॉलॉजी बघितली,कसं.. कसं… घडत आलं तर आपल्या बरोबर लक्षात येते. एवढं आता कसं काय बोलायचं सूचतंय? सखोल चौकशी होईल की, मात्र तुम्ही मंत्रिमंडळात असताना सखोल चौकशी होणार नाही. हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत आमचा स्टॅन्ड बदललेला नाही असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विष्णू चाटे हे कोणाचे खास आहेत?

कुठल्याही दिवशी आम्ही हे म्हणालो नाहीत की तुम्ही खुनाचे आरोपी आहात, खुनातले आरोपी आहेत, ते तुमचे मात्र खास आहेत. विष्णू चाटे हे कोणाचे खास आहेत? नावासकट आम्ही सांगतोय विष्णू चाटे हा कोणाचा माणूस आहे? तुमच्या पक्षाचा तो तालुकाध्यक्ष आहे. आपण हे सांगू शकाल का की तो तुमचा माणूस नाही.. अख्या गावावर दरोडा घालायचा. आणि सगळे आपलीच माणसं असणार आणि सांगायचं माझा काही संबंध नाही असे हे सर्व असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

विष्णू चाटे याचा ‘सीडीआर’ काढा

विष्णू चाटे याचा ‘सीडीआर’ काढा… ते कुठे कुठे ? कोणाशी बोलायचे? हे नाव काढा. साधारणपणे कोणताही तपास सुरु असताना पोलिस चौकशीत पुढे काय झाले याची माहिती देत असतात. पण. हा पहिलाच गुन्हा आहे पोलीस माहिती द्यायला तयार नाहीत. खून झाला आहे तर एवढी गुप्तता का पळत आहेत? आपण जर सांगितलं तर याच्यातून अजून खणलं जाईल आणि खणल्यानंतर त्यातून हिरा बाहेर येईल, म्हणून सांगायच नाही सगळं लपवायचं असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.