डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय रद्द करण्यासाठी बायडन यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’, भारतासाठीही ‘हे’ निर्णय महत्त्वाचे

जो बायडन 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर तात्काळ काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. बायडन यांची टीम अशा आदेशांची एक यादीच तयार करत आहे

डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय रद्द करण्यासाठी बायडन यांचा 'अ‍ॅक्शन प्लॅन', भारतासाठीही 'हे' निर्णय महत्त्वाचे
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 7:35 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडन 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या 46 व्या अध्यक्षपदाची शपथ घेतील. यासाठी बायडन आणि कमला हॅरिस यांची टीम आधीपासूनच तयारीला लागली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, जो बायडन 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर तात्काळ काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. बायडन यांची टीम अशा आदेशांची एक यादीच तयार करत आहे ज्यावर शपथ घेतल्यानंतर लगेचच स्वाक्षरी केली जाईल. यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द केले जाणार आहेत (Joe Biden action plan to reverse Trump policies and Order).

बायडन यांच्या टीमकडून ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्णयांची एक यादीच तयार केली जात आहे. ते लवकरच रद्द केले जाणार आहेत. याचा भारताला देखील मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. बायडन सरकार एच-1बी व्हिजाची मुदत वाढवणार असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय विविध देशांना रोजगारावर आधारित दिला जाणारा व्हिजा रद्द करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो.

या दोन्ही निर्णयांमुळे भारतातील कुशल कामगारांना मोठा फायदा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या काही निर्णयांमुळे अमेरिकेतील भारतीयांना मोठा फटका बसला होता. ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिजाधारकांच्या जोडीदारासाठीच्या कामकाज व्हिजा परमिट रद्द केलं होतं. हा निर्णय देखील बायडन यांच्याकडून बदलण्यात येण्याची शक्यता आहे.

बायडन सरकार कोणते निर्णय घेण्याची शक्यता?

  • भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी मदत करणे आणि दहशतवादविरोधी लढाईत मदत करणे.
  • जागतिक हवामान बदल आणि द्विपक्षीय व्यापारात वाढ करण्यासाठी ठोस निर्णय घेणे.
  • आरोग्य क्षेत्र आणि साथीरोग रोखण्यासाठी सुधारणा करणे, उच्च शिक्षण, अंतराळ मोहिमा यात भारताला सहकार्य करणे.
  • 5 लाख भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्याचा निर्णय.
  • भारताच्या 5 लाख नागरिकांसह 1 कोटी 10 लाख इतर देशातील नागरिकांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यासाठी रोडमॅप तयार करणार.
  • दरवर्षी कमीतकमी 95,000 शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी व्यवस्था उभी करणार.
  • भारतीयवंशाचे अमेरिकन डॉक्टर विवेक मूर्ती यांना कोरोना विषाणूवरील नियंत्रणासाठी बायडन यांच्या टास्कफोर्सचं सहअध्यक्ष म्हणून नेमणे.
  • विवेक मूर्ती यांना बायडन यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रालयाची जबाबदारीही देण्याची शक्यता.

संबंधित बातम्या :

Kamala Harris | कमला हॅरिस यांच्याकडून विजयाचे श्रेय आईला, जो बायडन यांनाही धन्यवाद

US Election 2020 : डेमोक्रॅसी रॉक! बॉलिवूडमधून जो बायडन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!

संबंधित व्हिडीओ पाहा :

Joe Biden action plan to reverse Trump policies and Order

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.