अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच बायडन यांचं पहिलं ट्विट, म्हणतात…
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत पराभव केला आहे.
वॉश्गिंटन : अमेरिकेचे (US Election) 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आता सगळ्या जगाला मिळालं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांचा दणदणीत पराभव केला आहे. अमेरिकेची जनता आपल्यालाच राष्ट्राध्यक्षपदाची संधी देईल, असा विश्वास बायडन यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. अखेर आज बायडन ‘महासत्तेचे महासत्ताधीश’ म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच त्यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Joe Biden First tweet After Win US Election)
गेल्या दोन दिवसांपासून मतमोजणी सुरु होती. अखेर भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 10 च्या सुमारास जो बायडन विजयी झाल्याचं अमेरिकन वृत्तसंस्थांनी जाहीर केलं. जो बायडन या निवडणुकीत 273 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. त्यानंतर ट्विट करुन जो बायडन यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानले आहेत.
“अमेरिकेसारख्या महासत्ताधिश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुम्ही मला मतदान केलं असेल किंवा नाही पण तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
America, I’m honored that you have chosen me to lead our great country.
The work ahead of us will be hard, but I promise you this: I will be a President for all Americans — whether you voted for me or not.
I will keep the faith that you have placed in me. pic.twitter.com/moA9qhmjn8
— Joe Biden (@JoeBiden) November 7, 2020
व्हाइट हाऊसमधील राजकारणाचा तब्बल 46 वर्षे अनुभव असलेले आणि दोनदा अमेरिकेचे उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडन हे अनेक कारणांनी प्रसिद्धही आहेत आणि वादग्रस्तही ठरलेले आहेत. जो बायडन अर्थात जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनिअर यांचा जन्म 1942मध्ये पेन्सिलवेनियाच्या स्क्रँटन येथे झाला. लहानपणीच त्यांचे कुटुंबीय डेलवेअरला राह्यला आले होते. त्यांना कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार पाहावे लागले.
बायडन पहिली पत्नी निलीया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या 46व्या वर्षी मुलगा ब्यू याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. मात्र, कौटुंबिक संकट आल्यानंतरही अमेरिकन राजकारणात ठामपणे उभा राहिलेला हा योद्धा तसूभरही डगमगला नाही.
सर्वात तरूण सिनेटर
जो बायडन हे डेलवेअरमधून 6 वेळा सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. 1972मध्ये निवडून आलेले ते सर्वात तरूण सिनेटर होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची त्यांची ही तिसरी निवडणूक आहे. 1988मध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाङमय चोरीच्या आरोपमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्यांदा त्यांनी 2008मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जो बायडन यांना ओळखलं जातं. ओबामांच्या कार्यकाळात ते 2008 आणि 2016मध्ये दोनदा उपराष्ट्रपती होते. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयी व्हावेत म्हणून स्वत: बराक ओबामा यांनी बराच प्रयत्न केला.
वादग्रस्त बायडन
जो बायडन अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर वाङमय चौर्याचाही आरोप झाला होता आणि तो त्यांनी मान्यही केला होता. लॉ स्कूलमध्ये पहिल्याच वर्षी कायद्याच्या समीक्षेचा लेख चोरल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. ब्रिटीश लेबर पार्टीचे नेते नील किन्नॉक यांच्या भाषणाचीही त्यांनी चोरी केली होती. तसेच सीनेट कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
(Joe Biden First tweet After Win US Election)
संबंधित बातम्या
जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव
Joe Biden | ‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?