यांचंही ठरलं! जो बिडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत घोषणा
डेमोक्रॅटिक पक्षाने जो बिडेन यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली.
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने मंगळवारी जो बिडेन यांची 2020 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जो बिडेन आव्हान देतील. (Joe Biden is Democratic Party’s candidate for President of the US 2020)
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे अंतर्गत मतदान ऑनलाईन पद्धतीने घेतले असता सर्व 50 स्टेट्समधील मतदारांनी जो बिडेन यांना पाठिंबा दिला.
It is the honor of my life to accept the Democratic Party’s nomination for President of the United States of America. #DemConvention
— Joe Biden (@JoeBiden) August 19, 2020
“अंतकरणापासून सर्वांचे आभार. मला आणि माझ्या कुटुंबाला जग जिंकल्याचा आनंद होत आहे” अशा भावना जो बिडेन यांनी व्यक्त केल्या. गुरुवारी ते आपले सविस्तर मनोगत व्यक्त करणार आहेत.
हेही वाचा : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी
जून महिन्यातच 3,900 पदाधिकाऱ्यांनी बिडेन यांना एकमुखी समर्थन दिल्याने ऑनलाईन मतदान ही केवळ औपचारिकता होती. यावेळी, ट्रम्प यांचा साम्राज्य खालसा करण्यासाठी अपक्ष आणि रिपब्लिकन पक्षातील नाराज नेत्यांचे डेमोक्रॅटिक पक्षाने स्वागत केले.
72 वर्षीय 2009 जो बिडेन यांनी जानेवारी 2009 ते जानेवारी 2017 या कालावधीत अमेरिकेचे 47 वे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. बराक ओबामा अध्यक्षपदी असताना बिडेन यांनी उपाध्यक्षपद सांभाळले होते. आता बिडेन नेतृत्व स्वीकारण्यास उत्सुक आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. (Joe Biden is Democratic Party’s candidate for President of the US 2020)