Joe Biden | जो बायडन यांच्या कार्यकाळात 5 लाख भारतीयांना मिळू शकते अमेरिकेचे नागरिकत्व

जो बायडन यांच्या प्रचारातील मुद्यांनुसार 5 लाख प्रवासी भारतीय नागरिकांनाी अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. (Joe Biden may grant citizenship to over five lakh Indians)

Joe Biden | जो बायडन यांच्या कार्यकाळात 5 लाख भारतीयांना मिळू शकते अमेरिकेचे नागरिकत्व
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 8:36 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघी 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. जो बायडन यांच्या प्रचारातील मुद्यांनुसार 5 लाख प्रवासी भारतीय नागरिकांनाी अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. बायडन यांच्या शपथविधीनंतर यादृष्टीने कामकाज सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (Joe Biden may grant citizenship to over five lakh Indians)

अमेरिकेतील ज्या प्रवासी नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत, अशा 1 कोटी 10 लाख लोकांना नागरिकत्व देण्याची योजना जा बायडन यांच्याकडून आणली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत 5 लाख प्रवासी भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. याशिवाय अमेरिकेत दरवर्षी 95 हजार शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याची यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. ही माहिती जो बायडन यांच्या प्रचार अभियानाच्या धोरणात्मक पत्रिकेत देण्यात आली आहे.

स्थलांतर सुधारणा कायदा

जो बायडन यांच्या प्रचार अभियानानं जारी केलेल्या धोरणांमध्ये, बायडन लवकरच काँग्रेसमध्ये स्थलांतर सुधारणा कायदा मंजूर करण्याबाबत काम सुरु करतील, असं सांगण्यात आलं आहे. याद्वारे अमेरिकेतील व्यवस्था आधुनिक बनवण्यावर जोर असेल. यानुसार दरवर्षी 95 हजार शरणार्थींना देशात दरवर्षी प्रवेश देण्यासाठी काँग्रेससोबत काम करण्यात येईल.

भारताला सुरक्षा परिषदेत स्थान?

जो बायडन यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर भारताच्या नजरा दोन्ही देशातील संबंध बळकट करण्यावर असतील. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्य म्हणून संधी मिळते का पाहावे लागेल. 2006 मध्ये जो बायडन भारत आणि अमेरिका हे देश 2020 या वर्षी सर्वात जवळ असणारे देश असतील, असं म्हटलं होतं.

बायडन सरकार कोणते निर्णय घेण्याची शक्यता?

  • भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी मदत करणे आणि दहशतवादविरोधी लढाईत मदत करणे.
  • जागतिक हवामान बदल आणि द्विपक्षीय व्यापारात वाढ करण्यासाठी ठोस निर्णय घेणे.
  • आरोग्य क्षेत्र आणि साथीरोग रोखण्यासाठी सुधारणा करणे, उच्च शिक्षण, अंतराळ मोहिमा यात भारताला सहकार्य करणे.
  • 5 लाख भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्याचा निर्णय.
  • भारताच्या 5 लाख नागरिकांसह 1 कोटी 10 लाख इतर देशातील नागरिकांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यासाठी रोडमॅप तयार करणार.
  • दरवर्षी कमीतकमी 95,000 शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी व्यवस्था उभी करणार.
  • भारतीयवंशाचे अमेरिकन डॉक्टर विवेक मूर्ती यांना कोरोना विषाणूवरील नियंत्रणासाठी बायडन यांच्या टास्कफोर्सचं सहअध्यक्ष म्हणून नेमणे.
  • विवेक मूर्ती यांना बायडन यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रालयाची जबाबदारीही देण्याची शक्यता.

संबंधित बातम्या :

Kamala Harris | कमला हॅरिस यांच्याकडून विजयाचे श्रेय आईला, जो बायडन यांनाही धन्यवाद

US Election 2020 : डेमोक्रॅसी रॉक! बॉलिवूडमधून जो बायडन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!

(Joe Biden may grant citizenship to over five lakh Indians)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.