अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार शिगेला, ट्रम्प-बायडेन यांचे कोरोना लस मोफत देण्याचे आश्वासन
जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास कोरोना विषाणूवरील लस सर्वांना मोफत देण्याची घोषणा केली आहे. (Joe Biden said if he won election then corona vaccine is free for every American citizens)
न्यूयॉर्क : अमेरिकतील राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी निवडूण आल्यास कोरोना विषाणू वरील लस सर्वांना मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या राष्ट्रीय रणनितीचा भाग असेल, असे बायडेन यांनी सांगतिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कोरोनावरिल लस मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. (Joe Biden said if he won election then corona vaccine is free for every American citizens)
जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्र सोडले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सोडून दिल्याचा आरोप बायडेन यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प फेस मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याची टीका जो बायडेन यांनी केली. कोरोना विषाणू संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे ट्रम्प पालन करत नाहीत, असा आरोप बायडेन यांनी करत हा प्रचाराचा मुद्दा बनवला होता. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रयत्न करणार असल्याचं बायडेन यांनी सांगितले आहे.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला 10 दिवस राहिले असताना जो बायडेन यांनी कोरोना विषाणूवरील लस मोफत देणार असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, अध्यक्षीय वादविवादामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले. यावेळी पर्यावरणासंदर्भातील आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, रशिया आणि चीनवर निशाणा साधला. भारत, रशिया आणि चीन हे आपल्या देशातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्याउलट अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करणारा देश असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते आपलं काय संरक्षण करणार, ओबामांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र
“भारत विषारी वायू सोडणारा देश!” पंतप्रधान मोदींच्या मित्राची भारतावर टीका
(Joe Biden said if he won election then corona vaccine is free for every American citizens)