Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी

ओसवाल यांनी आपल्या नाकोडा ज्वेलर्स दुकानात चक्क कांदे भरुन ठेवले असून ते होलसेल रेट ने विकत आहेत.

तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 5:33 PM

रायगड : कोरोनाचे संकट आणि त्यात सर्वत्र सुरु (Jweller Selling Onions) असलेल्या लॉकडाऊनमुळे सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम निघून गेलेला आहे. याशिवाय सोन्या-चांदीचे भाव देखील गगनाला भिडलेले आहेत. यामुळे सराफ व्यापाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. याला रायगड मधील सराफा व्यापारी देखील अपवाद नाहीत. मात्र, येथील पाली मधल्या ज्वेलर्स दुकानाचे मालक रवी ओसवाल यांनी या अडचणी वर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. ओसवाल यांनी आपल्या नाकोडा ज्वेलर्स दुकानात चक्क कांदे भरुन ठेवले (Jweller Selling Onions) असून ते होलसेल रेट ने विकत आहेत.

आजघडीला सोन्याचा भाव जवळपास 47 हजार प्रती तोळे तर चांदीचा भाव 45 हजार प्रती किलो आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीय आणि लग्नसराई यामध्ये सोन्याच्या खरेदीला वेग येतो. मात्र, लॉकडाऊन असल्याने ज्वेलर्सची दुकाने यावेळी बंद होती.

अनेकांनी लग्ने पुढे ढकलली, तर सणासुदीला कोणी दागदागिन्यांची खरेदी केली नाही. त्यात सोन्याचे भाव प्रचंड वधारले आहेत. अखेर उत्पन्नाचे साधन गेल्यावर करावे काय? या चिंतेपोटी येथील ज्वेलर्स दुकान मालक रवी ओसवाल यांनी आपल्या ज्वेलर्स दुकानात चक्क होलसेल कांदे विकण्याचा निर्णय नाईलाजाने घेतला आहे (Jweller Selling Onions).

रायगडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 623 वर

रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात 33 नव्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या 33 रुग्णांमध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 13, पनवेल ग्रामीण क्षेत्रातील 12, उरण 4, खालापूर 1, कर्जत 1, माणगाव 1, महाड तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 2 आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 623 वर पोहोचली आहे.

Jweller Selling Onions

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात लालपरी रस्त्यावर, नॉन रेड झोनमध्ये एसटी वाहतूक सुरु

नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोना रुग्णांचा आकडा 1422 वर

जळगावातील कोरोनाबाधितांचा आकडा 381 वर, दिवसभरात 30 जणांना लागण, एका कुटुंबातील 16 जणांचा समावेश

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.