पावती बुकमुळे खोळंबा, जमत नसेल तर करु नका, पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना खडसावलं
कल्याणमध्ये पालिकेचे अधिकारी वेळेवर न आल्याने आणि पावती बुक नसल्याने पोलीस आणि नागरिक रस्त्यात ताटकळत उभे राहावे लागले.
कल्याण : कल्याणमध्ये पालिकेचे अधिकारी वेळेवर न आल्याने आणि पावती बुक नसल्याने (Kalyan Police Vs KDMC Officers) पोलीस आणि नागरिक रस्त्यात ताटकळत उभे राहावे लागले. यावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “तुम्हाला जमत नसेल तर नका करु, कामाची ही पद्धत नाही”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं (Kalyan Police Vs KDMC Officers).
कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकं आहेत जे नियम पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत. पोलीस आणि महापालिकेकडून संयुक्त कारवाई सुरु आहे. आतापर्यंत लाखोचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही काही नागरिक ऐकायला तयार नाही. आज देखील कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण आपल्या पोलीस पथकासोबत पोहोचले. जवळपास एक तास पोलीस कायदा मोडणाऱ्या नागरिकांना एका बाजूला उभं करुन ठेवले होते.
वारंवार विनंती करुन देखील पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पावती बुक घेऊन पोहोचले नाही. पावती फाडण्याची जवाबदारी ही महापालिकेची असल्याने, पोलिसांना आणि नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. महापालिकेचा एक कर्मचारी याठिकाणी आला. मात्र, त्यांच्याकडे पावती बुक नव्हती, एका तासानंतर पालिकेचे अधिकारी भागाजी भांगरे पोहचले. भांगरे यांना पोलीस अधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले.
“तुम्हाला काम करायचं नसेल तर नका करु, आम्हालाही कामाला नका लावू, एक पावती पुस्तक घेऊन यायला एक तास लागतो. ही कामाची पद्धत नाही. कृपा करुन असं करु नये”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं. यानंतर देखील महापालिकेचे अधिकारी शिस्त पाळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आधी घरात जोरदार गणेशोत्सव, मग एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोना संसर्गhttps://t.co/VLbiGok90Z
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2020
Kalyan Police Vs KDMC Officers
संबंधित बातम्या :