कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे.(Kalyan Young Girl Molested In Local train)

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 2:17 PM

कल्याण : धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे. मध्य रेल्वेच्या आठगाव ते कसारा या रेल्वे स्थानकात ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नाव आहेत. (Kalyan Young Girl Molested In Local train)

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा येथे राहणाऱ्या एक 21 वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठय़ा पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकलने प्रवास करते. नेहमीप्रमाणे 25 नोव्हेंबरला ही तरुणी ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात चढली. त्यावेळी लोकलमध्ये अनेक महिला होता.

मात्र आठगाव स्थानकापर्यंत ही ट्रेन रिकामी झाली होती. त्यामुळे त्या लोकलच्या डब्ब्यात ही तरुणी एकटीच होती. यावेळी आठगाव स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगचे तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले.

या दरम्यान या दोघांनी तरुणीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. या तरुणीने शेवटपर्यंत प्रतिकार करत होते. या झटापटीत तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत गाडी कसारा स्थानकात पोहोचली होती. त्यावेळी एक तरुण पसार झाला.

तर दुसऱ्या आरोपीला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपी अमोल जाधव आणि अमन हिले हे दोघे ठाण्याला एका कंपनीत कामाला आहेत. या दोन्ही आरोपींच्या विरोधात 307, 354 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  (Kalyan Young Girl Molested In Local train)

संबंधित बातम्या : 

धुळ्यात बनावट दारुचा मोठा कारखाना उद्ध्वस्त, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

दुबईचं सीमकार्ड वापरत बंगळुरुतून रॅकेट ऑपरेट, नवी मुंबई पोलिसांची आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.