पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला

भिवंडीतील दुर्घटनेची तुलना अभिनेत्री कंगना रनौतने पुलवामा चकमकीशी केली आहे. (Kangana Ranaut criticism CM Uddhav Thackeray And BMC on Bhiwandi building collapse)  

पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 12:43 PM

मुंबई : भिवंडी शहरात सोमवारी (21 सप्टेंबर) तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची तुलना अभिनेत्री कंगना रनौतने पुलवामा चकमकीशी केली आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितकी निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले, अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे. (Kangana Ranaut criticism CM Uddhav Thackeray And BMC on Bhiwandi building collapse)

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिका यांनी बेकायदेशीररित्या जेव्हा माझ्या घराचं तोडकाम करत होते, त्यावेळी त्यांनी या इमारतीवर लक्ष दिले असते तर आज जवळपास 50 लोक जिवंत असते. इतके सैनिक पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितकी निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले. मुंबईचं काय होणार हे देवाला माहिती…”असे ट्विट कंगना रनौतने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत आणि राज्य सरकारमध्ये ट्विट युद्ध सुरु आहे. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्याप्रकरणी ती सतत मुंबई महापालिका, राज्य सरकारवर टीका करत असते. भिवंडीमध्ये झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पालिका आणि राज्य सरकार टीका केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं प्रकरणं काय?

भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत सोमवारी 21 सप्टेंबर 2020 रोजी कोसळली. पहाटे 3.40 च्या सुमारात ही दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.

या दुर्घटनेनंतर जवळपास तीन दिवस NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु होते. या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील. तर जखमी झालेल्या नागरिकांचा खर्च शासन उचलेल अशी घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Kangana Ranaut criticism CM Uddhav Thackeray And BMC on Bhiwandi building collapse)

संबंधित बातम्या : 

Bhiwandi building collapse | भिवंडी इमारत दुर्घटनेत 38 बळी, अडीच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू

Bhiwandi building Collapse | भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.